Home /News /news /

Video : एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसैनिक नाराज; अभद्र शब्दात संतापाचा महापूर

Video : एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसैनिक नाराज; अभद्र शब्दात संतापाचा महापूर

शिंदेच्या बंडामुळे शिवसैनिक नाराज असल्याचंही दिसून येत आहे.

    मुंबई, 21 जून : शिवसेनेचे कट्टर (Shivsena Leader) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde Update) यांच्या बंडामुळे महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. या घटनेनंतर शिवसेनेच्या गोट्यात अस्वस्थता पसरली आहे. दरम्यान राज्यभरातून शिवसैनिकांचा संताप पाहायला मिळत आहे. भारतमाता चौकात सेनेच्या कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शन केलं. काही शिवसैनिकांनी वर्षा बंगल्यावर धाव घेत एकनाथ शिंदेंविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनीही समोर येऊन त्यांना वज्रमूठ दाखवली. दुसरीकडे सोशल मीडियावरही एकनाथ शिदेंच्या अकाऊंटवर विविध नाराजीच्या प्रतिक्रिया येत आहे. त्यामुळे शिंदेच्या बंडामुळे शिवसैनिक नाराज असल्याचंही दिसून येत आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. अत्यंत जहरी शब्दात त्यांच्यावर टीका करण्यात आली. अनेक सेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी तर अभद्र शब्दांचाही वापर केला. हे व्हिडीओमध्ये दाखवू शकत नाही. त्यामुळे म्यूट करण्यात आला आहे. राजकीय वर्तळाची latest Update महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना काही ब्रेक लागताना दिसत नाहीय. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी स्वत:च्या पक्षाविरोधात बंड पुकारलं असताना महाराष्ट्रातील आणखी सात आमदार हे दिल्लीच्या दिशेला रवाना झाले आहेत. हे सर्व आमदार अपक्ष आमदार असल्याची बातमी समोर येत आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या 30 पेक्षा जास्त आमदारांचं समर्थन असल्याची शक्यता आहे. तसेच 4 अपक्ष आमदारांचादेखील शिंदेंनी पाठिंबा आहे. हे आकडे ताजे असताना आता महाराष्ट्रातील आणखी सात आमदार दिल्लीला रवाना झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या घडामोडींमुळे महाविकास आघाडी सरकार आणखी अडचणीत आलं आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Eknath Shinde, Mumbai, Shivsena

    पुढील बातम्या