गोंदिया, 21 जून : औरंगाबाद, सोलापूरनंतर आता अफवांचा पेव गोंदियात फुटलाय. किडनी चोर फिरत असल्याची दहशत पसरली आहे. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात ही दहशत वाढत आहे. आज याच दहशती पायी एका अज्ञात भिकाऱ्याला आपला जीव गमवावा लागलाय. गोरेगाव तालुक्यातील तालुटोला ह्या गावात हा अज्ञात भिकारी वावरताना ग्रामस्थांना आढळला तर गावकऱ्यांनी त्याच्यावर किडनी चोर असल्याचा संशय घेत जबर मारहाण केली. या जबर मारहाणीत या अज्ञात व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे.
VIDEO :संशयाचं भूत सोलापुरातही!,मुलं चोरण्याच्या संशयातून दोघांना बेदम मारहाण
या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात २५ ग्रामस्थ विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाही.
VIDEO : संशयाचं भूत,औरंगाबादेत जमावाकडून महिलेसह दोघांना बेदम मारहाण
गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुले पळविणारी टोळी तसंच किडनी चोर ग्रामीण भागात फिरत असल्याची चांगलीच दहशत आहे. ही दहशत सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी फिरत आहे त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये असं आवाहन केलंय.