जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / VIDEO : संशयाचं भूत,औरंगाबादेत जमावाकडून महिलेसह दोघांना बेदम मारहाण

VIDEO : संशयाचं भूत,औरंगाबादेत जमावाकडून महिलेसह दोघांना बेदम मारहाण

VIDEO : संशयाचं भूत,औरंगाबादेत जमावाकडून महिलेसह दोघांना बेदम मारहाण

वैजापूर आणि गंगापूर तालुक्यात चोरांच्या अफवा पसरल्यानेच असे हल्ले होत आहेत. त्यामुळे आजपासून पाच दिवस दोन्ही तालुक्यातील इंटरनेट सेवा रात्री बंद ठेवण्यात येणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    औरंगाबाद, 15 जून : चोरी आणि अपहरणाच्या संशयावरून मारहाणीच्या घटना पेव फुटलाय. आज दोन तरुण आणि एका महिलेला गावकऱ्यांनी बेदम मारहाण केलीये. आठवड्याभरातली ही तिसरी घटना आहे. गंगापूर आणि वैजापूर तालुक्यात चोर समजून गावकरी संशयास्पद व्यक्तींना मारहाण करीत आहेत. आज औरंगाबाद शहराजवळील पडेगाव इथं दोन वेगवेगळ्या घटनात जमावाने तीन जणांना बेदम मारहाण केली. पहिल्या घटनेत  एक महिला घर भाड्याने बघण्यासाठी गेली होती या महिलेचं नाव पुजा गवई आहे. ती रांजणगाव येथे रूम शोधण्यासाठी गेली मात्र लोकांनी तीला मुले पळवणारी महिला समजून मारहाण केली. या मारहाणीत पुरूषांनीही मारहाण केलीये.

    दुसऱ्या घटनेत विक्रमनाथ लालुनाथ आणि मोहननाथ भैरवनाथ हे दोघे मूळ मध्यप्रदेश येथील आहेत. दोघेही बहुरूपी असून मागील दोन वर्षांपासून ते शहरात राहतात. आज सकाळी ते पडेगाव परिसरातील कासंबरीनगर येथे भिक्षुकीसाठी फिरत असतांना गावकऱ्यांनी त्यांनाही जबर मारहाण केलीये. जमावाने लाठ्या काठ्यांनी त्यांना मारहाण बेदम मारहाण केली. सकाळी साडे सहापासून ते नऊपर्यंत त्यांना मारहाण सुरु होती. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत त्यांची सुटका केली. यानंतर दोघानांही उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    चोर असल्याच्या संशयावरुन सहा जणांना बेदम मारहाण, दोघांचा मृत्यू

    वैजापूर आणि गंगापूर तालुक्यात चोरांच्या अफवा पसरल्यानेच असे हल्ले होत आहेत. त्यामुळे आजपासून पाच दिवस दोन्ही तालुक्यातील इंटरनेट सेवा रात्री बंद ठेवण्यात येणार आहे. 08 जून रोजी वैजापूर तालुक्यात चोर असल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी सहा जणांना बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत 2 जणांचा संशयित चोरांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी गावकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात