उत्तर प्रदेश, 22 मे: लग्नात हुंडा मागणं हा कायदेशीर गुन्हा आहे. मात्र तरीही काही भागात अजूनही ही प्रथा सुरु आहे. बऱ्याचंदा हुंड्यामुळे अनेक मुलींची लग्नही मोडली आहेत. मात्र आजचा किस्सा थोडा वेगळा आहे. हुंडा मागणं नवरदेवाला चांगलंच महागात पडलं आहे. नवरी मुलीच्या वडिलांनी आणि कुटुंबीयांनी नवरदेवाला असा धडा शिकवला की त्याच्या आयुष्यभर लक्षात राहिल. ही घटना उत्तर प्रदेश **(Uttar pradesh)**च्या अमेठी भागात घडली आहे. नववधूच्या कुटुंबियांना नवऱ्या मुलाला मारहाण केली तसंच पोलीस येईपर्यंत त्याला खोलीमध्ये बंदही करुन ठेवलं होतं. हुंड्यात (Dowry ) बुलेट मागणाऱ्या नवरदेवाचा आणि तिच्या वडिलांची धुलाई करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हेही वाचा- कोरोनासंदर्भातली ‘ही’ खास बातमी पुणेकरांसाठी, वाचा सविस्तर ही घटना अमेठी **(Amethi)**तल्या केसरिया सलीमपूर गावात घडली. 17 मे रोजील नसीम अहमद यांच्या मुलीचं लग्न होतं. वरात रायबरेली जिल्ह्यातल्या रोखा गावातून आली होती. नवरदेव मोहम्मद आमिर स्टेजवर बसला होता आणि लग्नाची तयारी सुरु होती. वरात गावात पोहोचल्यानंतर मुलीकडच्या कुटुंबियांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. लग्न पार पडलं. मुलानं जेवणाचा समारंभ सुरु झाल्यानंतर सासरच्यांकडे बाईक ऐवजी बुलेटची मागणी केली. मुलीच्या वडिलांनी मुलाची मागणी मान्य केली आणि बुकिंग होताच बुलेट देऊ असं आश्वासन देखील दिलं. यासाठी मुलीच्या वडिलांनी नवरदेवाला दोन लाखांचा चेक देखील दिला. मात्र नवरा मुलगा आणि त्याचे वडील बुलेटसोबत मुलीला सासरी घेऊन जाऊ अशी अट धरुन बसले. इतकंच काय तर मुलानं दिलेला चेकही फाडला आणि मुलीकडच्या पाहुण्यांना अपशब्द वापरुन शिवीगाळ सुरु केली. हा वाद इतका वाढला की, थेट तलाक (घटस्फोट) पर्यंत गोष्ट आली. त्यानंतर नववधूच्या कुटुंबियांना ही गोष्ट सहन झाली नाही. त्यांनी स्थानिक लोकांच्या मदतीनं नवरदेवाला एका खोलीत बंद करुन मारहाण केली. हेही वाचा- काय सांगता, कोरोनाच्या रुग्ण वाढीसाठी ‘हा’ महिना ठरला सर्वात घातक नववधूच्या कुटुंबियांनी ही घटना पोलिसांच्या कानावर घातली. तक्रार मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी नवरदेवाला आणि त्यांच्या वडिलांना पोलीस स्टेशनला नेलं. पोलिसांनी नवरा मुलगा, त्याच्या वडिलांसह 7 जणांवर हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.