पुणे, 22 मे: पुण्यातील कोरोना संसर्गाची (Corona Virus) दुसरी लाट आता ओसरू लागली आहे. चालू आठवड्यात तब्बल तीन वेळा दैनंदिन रुग्णवाढीचा आकडा हा 3 अंकी संख्येच्या आत म्हणजेच हजारांच्या खाली राहिला आहे. त्यामुळे पुणेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र दुसरीकडे पुणे (Pune Corona)ग्रामीण भागात अजूनही रुग्ण नियंत्रणात नाही आहे.
दुसऱ्या लाटेत पुणे शहरात कोरोनानं थैमान घातलं होतं. पण आता काही प्रमाणात दुसरी लाट बऱ्यापैकी कमी झाली आहे. तर पुणे ग्रामीण भागात अजूनही रुग्णवाढ नियंत्रणात आली नाही आहे. ग्रामीणमध्येही आजही 1500 च्या आसपास रुग्ण सापडत आहेत. थोडक्यात शहरातला कोरोना आता ग्रामीण भागात पसरु लागल्याचं चित्र काही ठिकाणी बघायला मिळत आहे.
पुणे शहरातील कोरोना आटोक्यात21 मे
973 रुग्ण - मृत्यू 63
20 मे
931 रुग्ण- मृत्यू 66
19 मे
1164 रुग्ण -मृत्यू 72
18 मे
1021 रुग्ण- मृत्यू 68
17 मे
685 रुग्ण- मृत्यू 66
पुणे शहरात दुसऱ्या लाटेची एप्रिल महिन्यात शहरातली दैनंदिन रूग्णवाढ ही 7 हजारांवर होती. तर ग्रामीण भागातली 4 हजारांवर जाऊन पोहोतली होती. ती आता अनुक्रमे हजार आणि दिड हजारांपर्यंत खाली आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.