'बिग बॉस म्हणजे वेड्यांचा बाजार'

'बिग बॉस म्हणजे वेड्यांचा बाजार'

बिग बॉस म्हणजे वेड्यांचा बाजार आहे असं बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेल्या उषा नाडकर्णींनी म्हंटलंय. या घरात रहाणं हे येऱ्या गबाळ्याचं काम नसल्याचं त्यांनी म्हंटलंय

  • Share this:

मुंबई, 02 जुलै : बिग बॉस म्हणजे वेड्यांचा बाजार आहे असं बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेल्या उषा नाडकर्णींनी म्हंटलंय. या घरात रहाणं हे येऱ्या गबाळ्याचं काम नसल्याचं त्यांनी म्हंटलंय. गेले 77 दिवस आपण या घरात कसं राहिलो याचं आपल्यालाच अश्चर्य वाटत असल्याचं त्यांनी म्हंटलंय. घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी न्यूज 18 लोकमतला पहिली प्रतिक्रिया दिली.

घरातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला या घरात पुन्हा कधीही जायला आवडणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. त्यासोबतच बिग बॉसचा पहिला सीझन नक्की कोण जिंकेल याबाबत काहीही सांगता येणं शक्य नसून आपण कुणाच्याही विजयासाठी प्रार्थना करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. मात्र बिग बॉसच्या आयोजकांनी बोलावलं तर फिनालेला आपण नक्की जाऊ असंही त्यांनी म्हंटलंय.

 सनी लिओनच्या बायोपिकचा टीझर तुम्ही पाहिलात का?

 मराठी बिग बॉसच्या घरामधून उषा नाडकर्णी 'आऊ'ट !

बिग बॉसच्या घरात ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला त्यांना त्यांना घरातच त्याची परतफेड करावी लागली असं त्यांनी सांगितलं. नंदकिशोर चौघुले आणि अन्य दोन जणांनी आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला होता असंही आऊंनी सांगितलं. मात्र अनिल थत्ते यांच्याविषयी विचारलं असता त्या माणसाशी आपला काहीही संबंध नसून आयुष्यात पुन्हा त्यांचं तोंडही पाहण्याची इच्छा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

सईने आऊ आणि शर्मिष्ठावर त्या मेघाचं ऐकून तिच्या सांगण्यानुसार वागत असल्याचा आरोप महेश मांजरेकरांसमोर विकेण्डचा वारमध्ये केला होता. मात्र आऊंना हा आक्षेप खटकला. आपण जसे आहोत तसंच या घरात वागलो. मात्र सईने मेघावर पाठीत खंजीर खुपसल्याचा केलेला आरोप चुकीचा असून उलट सईनेच मेघाच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

इंग्लंड दौऱ्यासाठी निवडल्या गेलेल्या या खेळाडूची बहीण आहे मिस्ट्री गर्ल!

 नटसम्राटाचा हॅम्लेटला नमस्कार!

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर नक्की काय करणार असं त्यांना विचारलं असता घरातून बाहेर पडताच एका सिनेमाच्या निर्मात्याचा फोन आला होता. घरात असल्याने त्यांचा सिनेमा पूर्ण करणं राहिलं होतं. आता बाहेर आल्यानंतर काही दिवस आपण आराम करणार असून त्यानंतर या सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण करणार असल्याचं आऊंनी सांगितलंय.

बुराडी प्रकरण : देवाला भेटायला जायचं आहे, 'मृत्यूच्या डायरी'त चार दिवसांपूर्वीच होती नोंद

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्याघरामधून दर आठवड्याप्रमाणे या आठवड्यामध्ये देखील ज्या सदस्याला कमी मतं मिळाली त्याला बाहेर जाणे अनिवार्य होते. बिग बॉस मराठीच्या घरामधून या आठवड्यामध्ये महराष्ट्राच्या लाडक्या आऊ म्हणजेच उषा नाडकर्णी यांना घरातून बाहेर पडावं लागलं. या आठवड्यामध्ये स्मिता आणि आऊ डेंजर झोनमध्ये आल्या होत्या. उषाजींना निरोप देताना शर्मिष्ठा, मेघा, पुष्कर, सई, आस्ताद.. सगळेच खूप भावूक झाले.पण हे सगळं नाटकी असतं त्याला काहीही अर्थ नसतो असंही त्या म्हणाल्या.

 

 

First published: July 2, 2018, 9:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading