दिल्ली,ता,2 जुलै : दिल्लीतल्या बुराडी गुढ मृत्यू प्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. 'देवाला भेटायला जायचं आहे' अशी नोंद घटनेच्या चार दिवस आधीच डायरीत करण्यात आल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळं हे मृत्यू अंधश्रद्धेचाच प्रकार असल्याचा दावा आणखी बळकट होऊ लागला आहे.
रविवारी दिल्लीतल्या बुराडी इथं भाटीया कुटूंबातले 11 जण मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली होती. ही हत्या आहे की आत्महत्या अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती मात्र आता एक एक पुरावे उघड होत असल्याने अंधश्रद्धेतूनच हा अघोरी प्रकार घडल्याचं स्पष्ट होत आहे.
तुरुंगात असलेल्या 'या' बाबाचे भक्त होते बुरांडीचं कुटुंब
बुराडी प्रकरणात समोर आली 'मृत्यूची डायरी', या आहेत धक्कादायक 10 गोष्टी
2015 पासूनच्या नोंदी या डायरीत असून शेवटची नोंद ही 30 जूनची आहे. या डायरीत जे लिहिलं आहे ते वाचलं तर काळजाचा थरकाप उडल्याशिवाय राहात नाही.
पोलीस तपासाअंतर्गत आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे या घरात एक रजिस्टर मिळालं. त्या रजिस्टरचं थेट कनेक्शन हे या 10 जणांच्या मृत्यूशी आहे. कारण मरण्याचा संपूर्ण प्लान या रजिस्टरमध्ये लिहला आहे.
कोण कुठे आणि कसं मरणार याचा संपूर्ण विश्लेषण या रजिस्टरमध्ये लिहलं आहे. कोण कोणत्या जागेवर उभं राहून फाशी घेणार याचा सगळा तपशील यात लिहला आहे आणि यात लिहल्याप्रमाणेच या सगळ्यांचे मृतदेह पोलिसांना सापडले.
बुरांडी मृत्यू प्रकरण : रजिस्टरमध्ये लिहिला होता मृत्यूचा प्लान, ठरल्या होत्या फाशी घेण्याच्या जागा
क्राईम ब्रांचच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या रजिस्टरच्या सुरूवातीच्या पानांवर सगळ्यांच्या नावासकट त्यांची फाशी घेण्याची जागा याबद्दल लिहलं आहे. कोण खुर्चीवरून फाशी घेणार, कोण दरवाजाजवळ फाशी घेणार हे सगळं या रजिस्टरमध्ये लिहलं आहे.
काय आहे डायरीत?
डोळ्यावर चांगल्या प्रकारे पट्टी बांधा
तुमच्या समोर शून्यच दिसलं पाहिजे
दोरखंडासोबत सुती ओढण्या किंवा साडी वापरायची
सात दिवस सतत पूजा करायची. मोठ्या श्रद्धेनं साधना करायची. कोणी गेलं तर दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरू करायचं.
बेबे उभी राहू शकत नाही तर दुसऱ्या खोलीत आडवी होऊ शकते
सगळ्यांचे विचार सारखेच असावेत. असं केलंत तर पुढची कामं व्यवस्थित होऊ शकतात.
मंद प्रकाश असावा
हाताच्या पट्ट्या राहिल्या तर मग डोळ्यावर डबल बांधायच्या
तोंडावरची पट्टीही डबल करा
रात्री 12 ते 1मध्ये ही क्रिया करायची आहे. याआधी होम करायचा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dairy burari, Death, God, Mystery, गुढ मृत्यू, दिल्ली, बुराडी