Parkinson मुळे पुतिन रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता; काय आहे हा आजार?
रशियाचे राष्ट्राध्यक्ष (russia president) व्लादिमीर पुतिन (vladimir putin) यांना Parkinson असल्याचं सांगितलं जातं आहे, ज्यामुळे ते आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.


रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी राजीनामा देणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्याशिवाय एका व्हिडिओत पुतिन अस्वस्थ दिसत असल्याचं समोर आलं. शारीरिकदृष्ट्या निरोगी दिसत असलेले पुतिन मानसिकदृष्ट्या ठिक नसल्याचं सांगितलं जातं आहे. पुतिन यांना 2015 पासून पार्किन्सन्सचा आजार असल्याचं सांगितलं जातं आहे.


पार्किन्सन्स हा एक प्रकारचा न्युरोलॉजिकल आजार आहे. यामध्ये शरीर थरथरणं, चालताना किंवा बोलताना अडचण येणं आणि डोळ्यांनी एका ठिकाणी लक्ष केंद्रीत करता न येण्यासारखा त्रास होतो. शरीराच्या बोटांपासून सुरू झालेला हा आजार हळूहळू संपूर्ण शरीरावर प्रभाव करतो. आजार वाढण्याबरोबरच याची लक्षणंदेखील मोठ्या प्रमाणात दिसू लागतात. त्यामुळे दैनंदिन कार्य करण्यात देखील अडचण निर्माण होते. (फोटो सौजन्य - Pixabay)


या आजारात व्यक्तीच्या मेंदूतील पेशी ज्यांना न्युरॉन म्हटलं जातं, त्या हळूहळू नष्ट व्हायला लागतात. त्यामुळे शरीरातील मांसपेशी काम करणं बंद करतात. हा आजार कशामुळे होतो याची वैज्ञानिकांनादेखील जास्त माहिती नाही. त्यामुळे यावर आजपर्यंत कोणत्याही प्रकारच्या उपचारांचा देखील शोध लागलेला नाही. डॉक्टर केवळ दैनंदिन कार्य कसं करावं हे सांगतात. (फोटो सौजन्य - Pixabay)


पार्किन्सन्स हा आजार अनुवांशिकदेखील सांगितलं जातो. मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे हा आजार येतो. महिलांच्या तुलनेत पुरुषांना याचा धोका जास्त असतो. दोन समान क्रोमोझोम एकत्र आल्यानं पुरुषांना याचा धोका जास्त प्रमाणात होऊ शकतो. चुकून कोणत्याही प्रकारचा विषारी पदार्थ किंवा पेस्टिसाईड शरीरात गेलं तरी या आजाराचा धोका असतो. (फोटो सौजन्य - AP)


साधारणपणे 60 वर्षांच्या वयानंतर हा आजार होऊ शकतो. अध्यक्ष पुतिन यांचं वय 68 वर्षे आहे. त्यामुळे त्यांना पार्किन्सन्स झाल्याचं खरं असू शकतं. डेलीमेलच्या एका रिपोर्टनुसार, रशियाच्या राजकारणावर पकड असलेल्या राजकीय विश्लेषक वेलेरी सोलोवई यांनी नुकताच माध्यमांत दावा केला होता. तसंच पुतिन यांचे पाय थरथरत असल्याचा एक व्हिडीओ देखील त्यांनी त्यावेळी दाखवला होता. width=


मॉस्कोमधून यासंदर्भात कोणताही दावा करण्यात आला नाही. तज्ज्ञांच्या मते पुतिन एक विधेयक आणण्याच्या प्रयत्नात आहेत. ज्यामुळे त्यांना अध्यक्षांच्या सर्व सुविधा आणि लिगल इम्युनिटी मिळत राहिल. लिगल इम्युनिटीअंतर्गत पुतिन यांच्यावर आजीवन कोणताही गुन्हेगारी स्वरुपाचा खटला चालवण्यात येणार नाही. त्यांच्या या प्रयत्नांमुळे ते सत्ता त्यागाचा विचार करत असावे असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.


पुढील वर्षी जानेवारीमध्ये किंवा पुढच्या काही महिन्यांत पुतिन उत्तराधिकाऱ्याकडे सत्ता सोपवतील असा अंदाज आहे. पार्किन्सनचा आजार झालेले पुतिन एकमेव प्रसिद्ध व्यक्ती नसून याआधी अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना हा आजार झाला आहे. प्रसिद्ध बॉक्सर मोहम्मद अली यांना देखील हा आजार होता. त्यांचे वयाच्या 74 व्या वर्षी निधन झालं. त्याचबरोबर अमेरिकेचे 41 वे अध्यक्ष एच डब्ल्यू बुश यांना देखील 2012 मध्ये व्हॅस्क्युलर पार्किन्सन्स झाला होता. त्यांचं वयाच्या 94 व्या वर्षी निधन झालं. अमेरिकेच्या सर्व राष्ट्रपतींमध्ये ते सर्वात जास्त काळ जगले. (फोटो सौजन्य - pxfuel)