धर्मशाला, 19 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी कंगनावर टीका केल्यानंतर आता त्यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. देवभूमी आणि वीरभूमि असलेल्या हिमाचल प्रदेशला (Himachal Pradesh) ‘ड्रग्सचा किल्ला’ (Fort of Drugs) असं म्हटल्यानंतर त्यांना आता मोठ्या विरोधाचा सामना करावा लागत आहे. हिमाचल प्रदेशाची प्रतिमा डागाळल्यानंतर धर्मशाळेचे (Dharamshala) वकील विश्व चक्षु यांनी उर्मिलाविरूद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी त्यांनी अभिनेत्रीला कायदेशीर नोटीस पाठवली आहे, ज्यात ‘हिमाचलच्या प्रतिमेला कलंक लावल्यामळे फौजदारी मानहानीचे दावा ठोकणार असं त्यांनी नोटीसीमध्ये लिहलं आहे. कोरोनाचा विळखा वाढताच या जिल्ह्याने घेतला मोठा निर्णय, आजपासून असणार कर्फ्यू काय वकील म्हणाले? ‘हिमाचल प्रदेश ही केवळ देवभूमि नाही तर देश आणि जगभरात वीर भूमि म्हणून ओळखली जाते. या राज्याच्या विरांनी देशाच्या सुरक्षेसाठी नेहमीच बलिदान दिलं आहे. इतकंच काय तर देशाची आणि हिमाचलची कन्या कंगना रणौत हिनं सुशांत मर्डर आणि बॉलिवूडमधील ड्रग्जप्रकरणात अनेक महत्त्वाचे खुलासे केले. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने असंवैधानिक कारवाई केली, ज्याचा संपूर्ण देशात विरोध होत आहे, कंगना हिला सगळ्यांनी उघडपणे पाठिंबा दिला. अशा परिस्थितीत बॉलिवूडमधली महाराष्ट्र सरकारची कठपुतली अशा प्रकारचं कृत्य करत असल्याचं’ वकिल विश्व चक्षु यांनी म्हटलं आहे. SSR case : करण जोहर, सलमानसह 8 बड्या सेलेब्रिटींना कोर्टाचे आदेश यापूर्वीही केली होती केस विश्व चक्षु म्हणाले की, हिमालयाचं मुकुट असलेले हिमाचल हे संपूर्ण देशासाठी प्रमुख राज्य आहे. त्यामुळे देशावर आणि राज्यावर अशा प्रकारचं वक्तव्य खपवून घेतलं जाणार नाही. महत्त्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय न्यायालय नेदरलँड्स इथं कोरोना पसरवल्याबद्दल चीनविरूद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी अॅडव्होकेट विश्व चाक्षू यांनीही एक अर्ज दाखल केला आहे. इतकंच नाही तर भारतीय सैन्य दलाला दिलेल्या वादग्रस्त विधानावर कन्हैया कुमार याच्याविरोधात धर्मशाला कोर्टात खटला चालू आहे, ज्यांचे वकील विश्व चक्षु आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.