SSR case : करण जोहर, सलमानसह 8 बड्या सेलेब्रिटींना कोर्टाचे आदेश

SSR case : करण जोहर, सलमानसह 8 बड्या सेलेब्रिटींना कोर्टाचे आदेश

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी (SSR case) कोर्टाने एक महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. सलमान खान, करण जोहरसह 8 मोठ्या सेलेब्रिटींना 7 ऑक्टोबरला कोर्टात बाजू मांडावी लागणार आहे.

  • Share this:

सुधीर कुमार,

मुझफ्फरपूर, 18 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी (Sushant singh rajput case) कोर्टाने एक महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. सलमान खान (Salman khan), करण जोहरसह (Karan johar) 8 मोठ्या सेलेब्रिटींना 7 ऑक्टोबरला कोर्टात हजर व्हावं लागणार आहे. मुझफ्फरपूर (muzaffarpur) जिल्हा कोर्टाने हा आदेश दिला आहे. या 8 जणांमध्ये अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि इतर बड्या असामींचा समावेश आहे. या सगळ्यांविरोधात इथळ्या न्यायालयात एका वकिलाने याचिका दाखल केली. त्याच्या सुनावणीदरम्याने कोर्टाने या सेलेब्रिटींना नोटिसा बजावल्या आहेत.

कोण आहेत हे 8 जण?

बिहार मधल्या मुझफ्फरपूर कोर्टात सुधीर ओझा नावाच्या एका वकिलाने या फिल्मी सेलेब्रिटींच्या विरोधात खटला दाखल केला आहे. ही माणसं सुशांतच्या मृत्यूला जबाबदार आहेत, असा दावा ओझा यांनी केला आहे. त्याबाबत सुनावणीच्या वेळी जिल्हा कोर्टाने या आठही जणांना न्यायालयात सादर व्हायचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार - सलमान खान, करण जौहर, आदित्य चोप्रा (Aditya Chopra), साजिद नाडियादवाला (sajit nadiyadwala), एकता कपूर, संजय लीला भन्साळी (sanjay leela bhansali), भूषण कुमार आणि दिनेश विजयन या आठ जणांना 7 ऑक्टोबरला न्यायालयात बाजू सादर करण्याचे आदेश आहेत. या आठ जणांच्या वतीने वकील त्यांची बाजू मांडू शकतात.

NCB ची कारवाई सुरू

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी CBI तपास करत आहे. या प्रकरणात ड्रग्ज रॅकेट असल्याचंही उघड झाल्याने नार्कोटिक्स विभागही स्वतंत्रपणे चौकशी करत आहे.

शुक्रवारी NCB च्या टीमने या प्रकरणी एक मोठा ड्रग पेडलर ताब्यात घेतला. राहिल विश्राम नावाचा हा ड्रग पेडलरच्या चौकशीतून 1 किलो ड्रग्जच्या साठ्याचा तपास लागला आहे. याची किंमत 3 ते 4 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचं समजतं. राहिलच्या घरातून साडेचार लाखाची रोख रक्कमसुद्धा NCB ला सापडली आहे. अनेक बॉलिवूड सेलेब्रिटी राहिलशी संपर्कात होत्या. राहिल अनेक बॉलिवूड पार्ट्यांनाही हजर असायचा अशी माहिती आहे.

NCB ने आतापर्यंत सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती, सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि इतर काही ड्रग माफियांना अटक केली आहे.

सॅम्युअल मिरांडा सुशांतचा घर मॅनेजर आहे. जेव्हा चौकशीत रिया आणि शोविकचे मोबाईल चॅट्स समोर आले तेव्हा सॅम्युअल मिरांडा हा ड्रग्ज सप्लाय करायचा अशी माहिती समोर आली होती. अब्दुल बासित परिहार हा ड्रग पेडलर आहे. इतकंच नाही तर बासित फक्त रिया आणि शोविकच्या सांगण्यावरून ड्रग्जचा जुगाड करायचा. दिपेश सावंत सुशांतसिंग राजपूतचा नोकर आहे. ड्रग्ज प्रकरणातही त्याचाही हात असल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान या प्रकरणात सुशांतच्या फार्म हाऊसचा मॅनेजर (Farmhouse Manager) पवनने सुशांत, रिया आणि तिच्या कुटुंबाबाबत मोठा खुलासा केला आहे. सुशांत आपल्या लोणावळ्यातील फार्महाऊसवर ड्रग्ज पार्टी करायचा. त्यामध्ये त्याचे सेलेब्रिटी मित्र नेहमी ड्रग्स घेत असत, असा कबुलीजबाब रियाने एनसीबीला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. दरम्यान सुशांतच्या फार्महाऊस मॅनेजर पवनचीही सीबीआयने चौकशी केली आहे. त्यानंतर रिपब्लिकन टीव्हीशी बोलताना त्याने सुशांत आणि रियाबाबत मोठी माहिती दिली आहे.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: September 18, 2020, 5:09 PM IST

ताज्या बातम्या