मुंबई 19 एप्रिल: Lokdownच्या काळात घरातच राहा बाहेर निघू नका असं आवाहन सरकार करत आहे. करण कोरोनाचा प्रसार रोखायचा असेल तर घरात राहणं हाच एकमेक मोठा उपाय आहे. पण सरकारच्या सूचनांचं पालन न करता अनेक टवाळखोर बाहेर फिरताना दिसत आहेत. मुंबईतल्या भेंडी बाजार, नागपाडा आणि डोंगरी विभागात लॉकडाऊनच जास्त उल्लंघन होत असल्याचं दिसून येत आहे. डोंगरीतल्या दोन तरुणांनी टीक टॉक व्हिडीओ तयार करून पोलिसांनाच थेट आव्हान दिलं. डोंगरी भागात फक्त आमचीच चालते, इथे पोलीस काही करू शकत नाही अशा अर्थाचा व्हिडीओ या तरुणांनी तयार केला होता.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या टवाळखोर मुलांना ताबात घेतलं. त्यांची डोंगरी पोलीस स्टेशनपर्यंत धिंड काढली. आपली चूक झाली पुन्हा असं करणार नाही असा माफिनामा या तरुणांनी पोलिसांना दिला आहे. पोलिसांनी या समाजकंटक मुलांवर कायदेशीर कारवाई केली आहे.
एकीकडे राज्यातील आणि त्यातही राजधानी मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र अशा स्थितीतच मुंबईच्या टीबी हॉस्पिटलमधील भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. टीबी रुग्णालयाने कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या 45 कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलमध्येच क्वारन्टाइन केलं नसल्याची माहिती समोर आली आहे.
कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या 45 कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलमध्येच क्वारन्टाइन न केल्यामुळे या सर्वांना आपल्या घरी जावं लागलं. त्यामुळे घरी गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना संक्रमण होण्याची भीती वाटत आहे. कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलमध्येच क्वारेनटाईन करण्याचे सांगितले असतानाही हॉस्पिटल प्रशासनाने व्यवस्था केली नसल्याचा प्रकार घडला आहे.
हेही वाचा- आमदार रवी राणांना रुग्णालयात केलं दाखल, नवनीत राणांचेही थ्रोट स्वॅब तपासणीला
दोन दिवस वाट बघून अखेर 45 कर्मचारी घरी परतले. दहा बाय दहाच्या घरात कसे क्वारन्टाइन होणार, असा कर्मचाऱ्यांना प्रश्न पडला आहे. कोरोना चाचणीचे परिमाण बदलल्यामुळे एकाही कर्मचाऱ्याची चाचणी झालेली नाही. पाच दिवस वाट बघा, लक्षणे आढळली तरच तपासणीसाठी या, असे कस्तुरबा रुग्णालयाने सांगितलं असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली.