मुंबई 31 जानेवारी : मिनी काश्मीर म्हणुन ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये मुख्यमंत्री उद्भव ठाकरे हे तीन दिवसाच्या खाजगी दौर्यावर जातायेत. त्यासाठी महाबळेश्वर मधील वेण्णा लेक परिसरात हॅलिपॅड बनविण्यात आले असुन मोठा पोलीस बंदोबस्त या परिसरात ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी महाबळेश्वर मध्ये फ्लेक्स लावण्यात आले असून स्वागताची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री तीन दिवस सहकुटुंब महाबळेश्वर येथील राजभवन येथे वास्तव्य करणार आहेत. या दरम्यान महाबळेश्वर येथील एका लग्नसोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्र्यांचा हा पुर्ण खाजगी दौरा असुन राजकीय व्यक्ती आणि मिडियाला भेटण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. महाबळेश्वर मध्ये मुख्यमंत्री येणार असल्यामुळे वेण्णा लेक, घोडा रपेट मैदान हा परिसर पूर्ण बंद ठेवण्यात आला आहे.
मुळात कलाप्रेमी असलेल्या उद्धव ठाकरे यांना देश विदेशात फिरायला आवडतं. ते दरवर्षी विदेशात फिरायला जात असतात. राजकारणाच्या धबडग्यातून वेळ काढत ते जंगलातही फोटोशूटसाठी जात असतात. त्यांनी काढलेल्या फोटोंची पुस्तकेही प्रसिद्ध झालेली आहेत. निसर्ग, जंगल, वन्यप्राणी हे त्यांच्या खास आवडीचे विषय आहेत. आदित्य ठाकरे यांनीही पर्यावरणावरच्या प्रेमापोटी खास पर्यावरण मंत्रालय मागून घेतलं होतं. तर तेजस ठाकरे यांनी खेकड्याच्या अनेक नव्या प्रजाती शोधून काढल्या आहेत.
हेही वाचा...
तुम्ही अॅक्सिडंटल मुख्यमंत्री आहेत का? उद्धव ठाकरेंनी दिलं हे बेधडक उत्तर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Uddhav tahckeray