तुम्ही अ‍ॅक्सिडंटल मुख्यमंत्री आहेत का? राऊतांच्या प्रश्नांना उद्धव ठाकरेंनी दिलं हे बेधडक उत्तर

तुम्ही अ‍ॅक्सिडंटल मुख्यमंत्री आहेत का? राऊतांच्या प्रश्नांना उद्धव ठाकरेंनी दिलं हे बेधडक उत्तर

'बाळासाहेबांना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी मी कोणत्याही थराला जाण्याची तयारी केली होती.'

  • Share this:

मुंबई 31 जानेवारी : सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतात आणि ती गाजतेही. मात्र ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर संजय राऊत यांनी त्यांची पहिलीच मुलाखत घेतली असून ठाकरे यांनी त्यांच्या बिनधास्त प्रश्नांना बेधडक उत्तर दिली आहेत. या मुलाखतीचा काही भाग प्रसिद्ध झाला असून त्यांच्या मुलाखतीत काय असेल याची झलक त्यातून दिसणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या भिन्न विचार सरणीच्या पक्षांसोबत एकत्र आल्याने शिवसेनेवर सातत्याने टीका होत आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत अनेक खुलासे केला आहेत.

तुम्ही अ‍ॅक्सिडंटल मुख्यमंत्री आहेत का? असा प्रश्न राऊतांनी त्यांना विचारला त्यावर त्यांनी आपल्या ठाकरे शैलीत उत्तर दिलं. ते म्हणाले, गुलाबाचा गुलकंद हा बद्धकोष्ठ झालेल्यांवर उपचारही असतो. मी बाळासाहेबांना शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेल असं वचन दिलं होतं. ते वचन पूर्ण करण्यासाठी मी कोणत्याही थराला जाण्याची तयारी केली होती असंही त्यांनी सांगितलं.

भाजपच्या जवळच्या लोकांनीच घडवला भीमा कोरेगावचा हिंसाचार - अनिल देशमुख

पुन्हा येणार असं मी कधीही म्हणालो नव्हतो असा टोलाही त्यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला. या मुलाखतीत त्यांनी सरकारचा पुढचा प्लॅन, झालेले वाद, शरद पवारांसोबतचा अनुभव, तीन पक्षांच्या आघाडीचं सरकार चालविण्याचा अनुभव, सीएए, राम मंदिर अशा अनेक प्रश्नांना उत्तर दिलीत. उद्या ही मुलाखत प्रकाशित होणार आहे.

हेही वाचा...

सरकार बदललं म्हणून राजीनामा देणार नाही, महिला आयोगाच्या अध्यक्षांनी सूनावलं

रक्षाविसर्जन कार्यक्रमात नातेवाईकांनी घेतलं जेवण, 37 जणांना विषबाधा

WHOकडून जागतिक आणीबाणी घोषित, कोरोनाशी लढण्यासाठी भारत सज्ज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 31, 2020 12:37 PM IST

ताज्या बातम्या