Home /News /crime /

दुबईतून Online सुपारी, मुंबईच्या मित्रासह कर्नाटकात हत्या; पत्नीच्या हत्येचा प्लान पाहून पोलिसही हादरले

दुबईतून Online सुपारी, मुंबईच्या मित्रासह कर्नाटकात हत्या; पत्नीच्या हत्येचा प्लान पाहून पोलिसही हादरले

दुबईत बसून तरुणाने आपल्याच पत्नीचा प्लान आखला. मात्र या एका गोष्टींमुळे नेमका प्रकार पोलिसांच्या समोर आला.

    लखनऊ, 29 जुलै: उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधून एक हैराण करणारं वृत्त समोर आलं आहे. येथील एका व्यक्तीने दुबईमधून आपल्या पत्नीच्या हत्येची सुपारी दिली आणि भारतात पत्नीची हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे मारेकरी गोरखपूर येथील राहणारा असून त्याने कर्नाटकात जाऊन हत्या केली. गेल्या काही दिवसांपूर्वी कर्नाटक पोलिसांनी गोरखपूरमधून स्वामीनाथ याला अटक केली. त्याने कर्नाटकात एका महिलेची हत्या केली. त्यापूर्वी कर्नाटक पोलिसांनी त्याच्या यापूर्वीच्या गुन्हेदारीबद्दल तपास केला, तर त्याचं कशातच नाव आढळलं नाही. ब्लाइंड मर्डरची ही केस अखेर कर्नाटक पोलिसांनी सोडवली आहे. (contract of murder from Dubai help from Mumbai's friend police were also shocked to see his wife's murder plan) गोरखपूरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक दिनेश कुमार पी यांनी सांगितलं की, स्वामीनाथ दुबईमध्ये पेंट पॉशिशचं काम करीत होता. येथील त्याचा मित्र झालेल्या व्यक्तीच्या मदतीने त्याने स्वामीनाथ याला पत्नीच्या हत्येची सुपारी दिली. दुबईत बसून या व्यक्तीने आपल्या पत्नीची सुपारी दिली आणि स्वामीनाथच्या अकाऊंटमध्ये 5 लाख रुपयेदेखील पाठवले. या व्यक्तीने पत्नीच्या हत्येसाठी ऑनलाइन सुपारी दिली होती. हे ही वाचा-सेल्फीच्या वेडानं विद्यार्थ्यांचा घेतला जीव; एकाने दुसऱ्यासाठी मृत्यूला कवटाळलं कशी केली हत्या? मिळालेल्या माहितीनुसार, स्वामीनाथ मुंबईतील आपल्या मित्रासह कर्नाटकात पोहोचला आणि पार्सलवाला असल्याचं सांगून महिलेच्या घरात घुसला. येथे त्याने महिलेचा गळा आवळून तिची हत्या केली. आणि तिच्या अंगावरील दागिनेदेखील चोरले. यानंतर त्याने दरवाजा बाहेरुन लॉक केला. कर्नाटक पोलिसांनी या हत्येचा तपास सुरू केला तेव्हा पतीचे अकाऊंट डिटेल्स तपासले. त्यानंतर हा प्रकार समोर आला. सध्या हत्या करणारा स्वामीनाथ याला पोलिसांनी अटक केली आहे. आणि दुबईत बसलेल्या व्यक्तीवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्याला लवकरच अटक करण्यात येणार आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Dubai, Karnataka, Mumbai, Murder, Wife and husband

    पुढील बातम्या