पुणे, 16 जून : मागच्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड (pimpari Chinchwad) परिसरात चोरीच्या (Theft) घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान सकाळी फिरायला येणाऱ्या किंवा काही कामानिमीत्त चालत जाणाऱ्या व्यक्तींच्या गळ्यातील सोन्याच्या चेन पळवून (By breaking the gold chain) नेणाऱ्या चोरट्यांचा पिंपरी चिंचवड पोलिसांनी (pimpary Chinchwad police) बंदोबस्त केला आहे. स्पोर्टस बाईक वापरत चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीला पकडण्यात यश आल्याचे पिंपरी पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. (Pimpri police say they have nabbed a gang involved in chain snatching using a sports bike) दरम्यान 4 जणांपैकी दोघे अल्पवयीन (two minor) असल्याचेही सांगण्यात आले.
पिंपरी चिंचवड पोलिसांच्या क्राइम ब्रँचची काही पथके मागच्या काही दिवसांपासून चेन स्नॅचिंगच्या घटनांना आळा घालण्यासाठी कार्यरत होते. वृद्ध महिला आणि रस्त्यावर एकट्याने चालणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागीने लंपास करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ही पथके शोध घेत होती. पोलिसांनी केलेल्या तपासात संशयित उच्च श्रेणीतील स्पोर्ट्स बाइक वापरत होते आणि ते खूपच लहान असल्याचे आढळले होते. याचबरोबर या मुलांनी आपल्या पालकांना आपण चांगल्या कंपनीत पॅकिंग आणि साहित्य पुरवण्याचे काम करतो असे सांगत अंधारात ठेवले होते.
हे ही वाचा : Monsoon update : मान्सूनला महाराष्ट्रात उशिर होण्याचे कारण ठरतेय पाकिस्तान, ही आहेत कारणे
पोलिस उपायुक्त काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की चार संशयितांचा 2021 आणि 2022 मध्ये चेन स्नॅचिंगच्या किमान 15 घटनांमध्ये आणि वाहन चोरीच्या चार घटनांमध्ये सहभाग होता. गेल्या काही दिवसांपासून, आमची टीम ग्राउंड लेव्हल इंटेलिजन्स द्वारे माहिती गोळा करत होती. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतून यांच्या हालचालीतून शोध घेण्यात आला.
मागच्या तीन दिवसांपूर्वी (13 जून) रोजी, पोलिसांच्या एका पथकाला खबर मिळाली होती. चोरीच्या घटनांमध्ये सामील असलेले दोन अल्पवयीन मुले निगडी येथील अंकुश चौक परिसरात आले होते. गुन्हे शाखेच्या युनिट 2 च्या पथकाने सापळा रचला आणि 16 वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलांना एका उच्चस्तरीय स्पोर्ट्स बाईक आणि मंगळसूत्रासह ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात दुचाकी व मंगळसूत्र चोरीस गेल्याचे समोर आले आहे.
हे ही वाचा : वऱ्हाडींवर काळाचा घाला..! बोलेरो गाडी पडली खड्ड्यात; 7 ठार, तीन गंभीर जखमी
त्यानंतर दोन मुलांची चौकशी केली असता असे दिसून आले की नितीन सरोदे आणि दिलीप खंदारे या दोघांनी त्यांच्या पालकांना सांगितले होते की ते पॅकर आणि मूव्हर्स सर्व्हिसेसमध्ये काम करत आहेत. दरम्यान चोरीतून जास्त पैसे मिळत असल्याने त्यांनी हा मार्ग पत्करल्याचे समोर आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pimpari chinchavad, Pune (City/Town/Village), Pune crime branch, Pune crime news