मराठी बातम्या /बातम्या /agriculture /Monsoon update : मान्सूनला महाराष्ट्रात उशिर होण्याचे कारण ठरतेय पाकिस्तान, ही आहेत कारणे

Monsoon update : मान्सूनला महाराष्ट्रात उशिर होण्याचे कारण ठरतेय पाकिस्तान, ही आहेत कारणे

पाकिस्तानातून (Pakistan) सतत येणाऱ्या वाऱ्यांमुळे (wind) मान्सून (monsoon udpate) मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर अडकला आहे.

पाकिस्तानातून (Pakistan) सतत येणाऱ्या वाऱ्यांमुळे (wind) मान्सून (monsoon udpate) मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर अडकला आहे.

पाकिस्तानातून (Pakistan) सतत येणाऱ्या वाऱ्यांमुळे (wind) मान्सून (monsoon udpate) मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर अडकला आहे.

मुंबई, 16 जून : पाकिस्तानातून (Pakistan) सतत येणाऱ्या वाऱ्यांमुळे (wind) मान्सून (monsoon udpate) मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर अडकला आहे. दरम्यान अरबीसमुद्रातून (Arabian sea monsoon update) मान्सूनची वाटचाल योग्य असली तरी पाकिस्तानातून जोरात येणाऱ्या (Pakistan heavy wind flow in Maharashtra) वाऱ्यांमुळे महाराष्ट्राला लागून असलेल्या मध्य प्रदेशातील काही भागातून मान्सूनला पुढे सरकता येत नाही. Imd ने दिलेल्या माहितीनुसार मध्यप्रदेशातील बडवाणीमध्ये मान्सून थांबला (monsoon stop in Madhya Pradesh) आहे. दरम्यान मान्सूनने वाटचाल केल्यास बडवानी आणि इंदूरऐवजी जबलपूरमार्गे महाराष्ट्रात मान्सून प्रवेश करण्याची शक्यता आहे. मंगळवारी सायंकाळपासून जबलपूरमध्येही हलका पाऊस सुरू झाला आहे.

बंगालच्या उपसागरात मान्सूनच्या हालचाली तीव्र झाल्यामुळे हा पाऊस होत आहे. ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ वेद प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, जबलपूर आणि त्याच्या लगतच्या भागात दोन दिवस पावसाचा जोर वाढणार आहे, तर माळवा-निमारमध्ये दोन दिवस पाऊस हुलकावणी देण्याची शक्यता आहे. भोपाळमध्येही मान्सून 18 तारखेपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा :टीम इंडियात पहिल्यांदाच मिळाली Rahul Tripathi ला संधी, पुणेकरानं दिली भावुक प्रतिक्रिया

मान्सूनला उशीर होण्याचे कारण

शास्त्रज्ञ वेदप्रकाश सिंह म्हणाले की, अरबी समुद्रात मान्सून सक्रिय झाला आहे. तो पुढे सरकत आहे, मात्र पाकिस्तानकडून सतत येणाऱ्या वाऱ्यांमुळे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर तो अडकला आहे. बुधवारपासून पाकिस्तानकडून वाऱ्याची दुसरी फेरी मध्य प्रदेशात येणार आहे. आता एक प्रणाली आधीच सक्रिय आहे. अशा स्थितीत अरबी समुद्रातून येणारा मान्सून आणखी पुढे जाण्यास अडथळे होणार आहेत.

जबलपूरहून मान्सूनचा  प्रवेश

बंगालच्या उपसागरात आतापर्यंत मान्सूनचा वेग मंदावला होता, मात्र मंगळवारपासून त्यालाही वेग आला आहे. यामुळे मान्सूनचा पाऊस पुढे सरकू लागला आहे. त्यामुळे जबलपूर आणि त्याच्या लगतच्या छिंदवाडा, सतना या भागात मंगळवारी हलका पाऊस झाला. दरम्यान पुढच्या दोन दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : Nandurbar: खाऊ आणण्यासाठी निघालेल्या तीन चिमुकल्यांचा नदी पात्रात बुडून मृत्यू, नंदुरबारमधील हृदयद्रावक घटना

भोपाळ आणि इंदूरमधून येणाऱ्या पावसाची वाट पहावी लागणार 

सोमवारी संध्याकाळी भोपाळमध्ये पाऊस झाला, मात्र मंगळवारी फक्त ढगाळ वातावरण राहिले. वाऱ्यामुळे उष्मा कमी झाला असला तरी वाऱ्याच्या झळांमुळे दमट वातावरण तयार झाल्याचे सांगण्यात आले. हवामान विभागाचे प्रमुख सिंग म्हणाले की, भोपाळमध्ये मान्सून 18 जूनपर्यंत येऊ शकतो. इंदूर आणि आसपासच्या भागात पुढच्या दोन दिवसांत जोरदार पावसाची शक्यता आहे. मान्सून अरबी समुद्रातून आला तरी तो तिथेच मर्यादित राहण्याची शक्यता आहे. पुढे जाण्यासाठी त्याला पाकिस्तानकडून येणारे वारे थांबण्याची वाट पाहावी लागणार आहे. असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले.

राज्याच्या कमाल तापमानात चढ- उतार सुरू आहे. बुधवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ४२.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

First published:

Tags: Monsoon, Pakistan, Weather, Weather forecast, Weather update, Weather warnings