मध्य प्रदेश, 16 जून: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) छिंदवाडा (Chhindwara) येथे गुरुवारी एक मोठा रस्ता अपघात झाला. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, कोडा मऊहून छिंदवाड्याकडे येणारी बोलेरो गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या खड्ड्यात (big pothole) पडली.
या गाडीत लग्नाचे 8 वऱ्हाडी होते असे सांगण्यात येत आहे. बोलेरो समोर दुचाकी आल्यानं हा अपघात झाला असल्याचं बोललं जात आहे. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन जवळच असलेल्या खड्ड्यात पडले. या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमीचा स्थानिक रुग्णालयात मृत्यू झाला.
अग्निपथ योजनेविरोधात विद्यार्थी रस्त्यावर, ट्रेनच्या बोगीला लावली आग
तीन जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेच्या कारणाबाबत सांगितलं जात आहे की, बोलेरो गाडी भरधाव वेगात होती. त्यामुळे रस्त्याच्या कडेला उतरताच त्याचा तोल बिघडला आणि तो जवळच असलेल्या खड्ड्यात पडला. यात मोटारसायकलस्वार जखमी झाल्याचीही माहिती आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Madhya pradesh, Road accident