Home /News /news /

दिल्ली हिंसा: UAPA मध्ये उमर खालिदला अटक, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची मोठी कारवाई

दिल्ली हिंसा: UAPA मध्ये उमर खालिदला अटक, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची मोठी कारवाई

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उमर खालिद याला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. अनेक तासांच्या चौकशीनंतर उमर खालिदला अटक करण्यात आली.

    नवी दिल्ली, 14 सप्टेंबर : दिल्ली हिंसाचार प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आणखी एक मोठा कारवाई केली आहे. कारवाई करत स्पेशल सेलने उमर खालिदला अटक केली आहे. उमर खालिदला बेकायदेशीर प्रतिबंध कायदा (यूएपीए) अंतर्गत अटक करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर आज त्याला न्यायालयात हजर केलं जाण्याची शक्यता आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) माजी विद्यार्थी उमर खालिदला दिल्ली हिंसाचार प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उमर खालिद याला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. अनेक तासांच्या चौकशीनंतर उमर खालिदला अटक करण्यात आली. स्वस्त किंमतीत खरेदी करा प्रॉपर्टी, 29 सप्टेंबरपर्यंत ही बँक देतेय संधी दरम्यान, उमर खालिदच्या अटकेनंतर युनायटेड अगेन्स्ट हेट ग्रुपकडून एक निवेदन जारी केलं गेलं. यात युनायटेड अटेन्स्ट हेटने म्हटलं आहे की, '11 तासांच्या चौकशीनंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने उमर खालिदला दिल्ली हिंसाचार प्रकरणातील सूत्रधार म्हणून अटक केली आहे. दिल्ली पोलीस हिंसाचाराच्या तपासाच्या नावाखाली गुन्हेगारी विरोधाचं प्रदर्शन वाढवत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली हिंसाचाराचा कट रचल्याचा तपास स्पेशल सेल करत आहे. त्यासाठी याआधीही उमर खालिदवरची चौकशी झाली होती. या चौकशी दरम्यान, उमर खालिद हिंसाचाराबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. इतकंच नाही तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौर्‍यापूर्वी दिलेल्या भाषणाबद्दलही उमर खालिदची कसून चौकशी करण्यात आली होती. अमेरिकेतील तज्ज्ञाने सांगितली कोरोना लशीची खरी परिस्थिती; किमान एक वर्ष तरी... 23 ते 26 फेब्रुवारी दरम्यान झाली होती दंगल दरम्यान दिल्लीच्या पूर्वोत्तर जिल्ह्यात 23 ते 26 फेब्रुवारीमध्ये दंगल झाली होती. पोलिसांनी याच प्रकरणात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात या सर्वांची नावं आहेत. या दंगलीत 53 लोक ठार झाली होती आणि 581 लोक जखमी झाले होते, त्यापैकी 97 जण गोळी लागल्यामुळे जखमी झाले आहेत. पोलिसांनी या बड्याल लोकांना तीन विद्यार्थिनींच्या वक्तव्याच्या आधारे आरोपी बनवलं आहे.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    पुढील बातम्या