पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचं संकट, असा पार पडणार पहिला दिवस

पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचं संकट, असा पार पडणार पहिला दिवस

पहिल्या दिवशी अधिवेशनाचं कामकाज सकाळी 11 वाजता सुरू होईल. विधानसभा सकाळी 11 वाजता तर परिषद दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 06 सप्टेंबर : राज्यावर कोरोनाचं मोठं संकट आहे अशात दोन दिवसाचं पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. पण या अधिवेशानावरही कोरोनाचं संकट आहे. यामुळे जसे यावेळेस विधीमंडळ कामकाज तारांकित आणि लक्षवेधी प्रश्न नाहीत तसंच दीर्घकालीन चर्चाही होणार नाहीये. पहिल्या दिवशी अधिवेशनाचं कामकाज सकाळी 11 वाजता सुरू होईल. विधानसभा सकाळी 11 वाजता तर परिषद दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे.

यानंतर वेगवेगळ्या खात्याचे कॅबिनेट निर्णय कायद्यात रूपांतर व्हावे यासाठी सुमारे 13 नवीन विधेयक सभागृहात मंजूरीसाठी ठेवतील. 2020-21 च्या पुरवण्या मागण्या सभागृहात बहुमतासाठी ठेवल्या जातील. विधानसभा अध्यक्ष हे नवीन तालुकापदी नावं जाहीर करतील. तर माजी राष्ट्रपत्ती प्रणब मुखर्जी, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर पाटील, आमदार अनिल राठोड, सुधाकर पंत परिचारक यासह काही विधीमंडळ सदस्य पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव मांडतील अशी माहिती देण्यात आली आहे.

मुलाच्या अटकेनंतर रिया चक्रवर्तीचे वडील भडकले; दिली जळजळीत प्रतिक्रिया

खरंतर, कोरोनाच्या संकटामुळे अगदी साध्या पद्धतीने अधिवेशन पार पडणार आहे. राज्यात कोरोनाचा धोका हा वाढतच चालला आहे. त्यामुळे सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज उच्चांकी वाढ होत आहेत. शनिवारी आत्तापर्यंतची सर्वात जास्त संख्या आढळली. 24 तासांमध्ये तब्बल 20 हजार 489 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 312 मृत्यू झाला. राज्यात सध्या 2 लाख 20 हजार 661 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर राज्यातल्या कोरोना रुग्णाची एकूण संख्या 8 लाख 83 हजार 862 एवढी झाली आहे.

कोरोनाचा धोका वाढला, सांगली जिल्ह्यातील 2 आमदारांना झाली लागण

अशात, मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाचा वेग वाढत असतांनाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुंबई महानगरपालिका वॉर्ड अधिकारी, उपायुक्त, वैद्यकीय अधीक्षक आणि अधिष्ठाता यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढवा घेतला यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले महाराष्ट्रासाठी पुढचे तीन महिने धोक्याचे आहेत.

Published by: Renuka Dhaybar
First published: September 6, 2020, 7:52 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading