एकता कपूरला नकार देऊन कतरिना-प्रियांका फसल्या, या ऑफरमुळे लागला असता जॅकपॉट

एकता कपूरला नकार देऊन कतरिना-प्रियांका फसल्या, या ऑफरमुळे लागला असता जॅकपॉट

खरंतर 'नागीन' हा टीव्ही शो नव्हता तर एक चित्रपट होता, ज्याला एकता कपूरला मोठ्या स्क्रीनवर आणायचं होतं. या चित्रपटासाठी त्यांनी कतरिना कैफ आणि प्रियांका चोप्रा सारख्या अभिनेत्र्यांना ऑफर दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 25 डिसेंबर : सिनेसृष्टीत 'सीरियल क्वीन' म्हणून ओळखल्या जाणार्‍या निर्माता एकता कपूरने अनेक सुपरहिट सीरियल टीव्हीवर आणल्या. एकता कपूरकडे 'हम पांच', 'कहानी घर घर की' 'कारण सास भी कभी बहु थी', 'कसौटी जिंदगी की' सारख्या अनेक सुपरहिट सीरियल आहेत. पण एकता कपूरने 'नागीन' या सीरियलने सुरुवात करून चाहत्यांचा एक नवीन टप्पा गाठला. आता एकताने या मालिकेचा चौथा सीझन आणला आहे. पण खरंतर 'नागीन' हा टीव्ही शो नव्हता तर एक चित्रपट होता, ज्याला एकता कपूरला मोठ्या स्क्रीनवर आणायचं होतं. या चित्रपटासाठी त्यांनी कतरिना कैफ आणि प्रियांका चोप्रा सारख्या अभिनेत्र्यांना ऑफर दिली आहे.

नुकताच एकता कपूरने 'कंपेनियन' या चित्रपटाला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला. वास्तविक, या मुलाखतीत होस्ट अनुपमा चोप्राने बाहुबलीचे यश आणि हिंदी चित्रपटांत त्या मागे का पडल्या यासंदर्भात प्रश्न विचारला असता 'लोकांना माहित नाही की, डर्टी पिक्चर नंतर मी ठरवलं होतं की मी नागीन हा चित्रपट बनवणार आहे. ही सिनेमासाठी मी दोन अभिनेत्र्यांना ऑफर दिली आहे. यासाठी मी कतरिना कॅफकडे गेले होते' असं उत्तर एकता कपूरने दिलं.

एकता पुढे म्हणाली की, पण कतरिनाने मला या सिनेमासाठी नकार दिला. त्यानंतर मी प्रियांकाबद्दल विचार केला पण त्यावेळी तिने परदेशात जाण्याची तयारी केली होती. त्याचवेळी 'बाहुबली' रिलीज होत होता. मी हा कार्यक्रम टीव्हीवर केला. मला फक्त एवढेच हवे होते की जर एखादी मोठी अभिनेत्री या सिनेमासाठी हो म्हणाली तर मी 200 कोटीचा एकट्या नायिकाचा चित्रपट बनवून दाखवीन.

इतर बातम्या - अरे आवरा! व्हायरल होतोय Jingle Bellsचा पुणेरी पॅटर्न, ढोल-ताशांवरचा VIDEO बघाच

एकता कपूरची मालिका 'नागीन' टीव्हीवर सुपरहिट ठरली आहे. या शोमध्ये अभिनेत्री मौनी रॉय नागीनमध्ये पहिल्यांदा दिसली होती. यानंतर करिश्मा तन्ना, सुरभि ज्योती आणि या दिवसांत निया शर्मा आणि जसमीन भसीन या शोमध्ये नागाच्या भूमिकेत काम करत आहेत.

इतर बातम्या - सात जन्माचं नातं 16 दिवसांत संपलं, बॉम्बब्लास्टमध्ये जवान झाला शहीद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 25, 2019 06:52 PM IST

ताज्या बातम्या