जम्मू-काश्मीर, 25 डिसेंबर : जम्मू-काश्मीर सैन्यात काम करणारे जवान सौरभ कटारा कुपवाडा इथे झालेल्या बॉम्बस्फोटात ठार झाले आहेत. शहीद जवान सौरभ कटारा यांचं अवघ्या 16 दिवसांपूर्वी 8 डिसेंबर रोजी लग्न झालं होतं. सौरभ यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तर सौरभ यांच्या अशा जाण्यामुळे त्यांच्या पत्नीला मोठा धक्का बसला आहे. बुधवारी संध्याकाळी सौरभ कटारा यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी नेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ यांचा बुधवारी वाढदिवस होता. सौरभ आणि त्यांच्या मोठ्या भावाटचे एकाच दिवशी म्हणजे 8 डिसेंबर रोजी दोन सख्खाख बहिणींसह लग्न झाले होते. त्यानंतर, पाच दिवसांपूर्वी रजा संपल्यानंतर कुपवाडाला नोकरीसाठी गेले होते. पण काश्मीरमध्ये कुपवाडा इथे झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच गावात शोककळा पसरली तर सौरभ यांच्या घराजवळ मोठ्या संख्येने लोक जमा झाले असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
Salute the martyrdom of our brave soldier #Bharatpur, #Rajasthan's Sh. Saurabh Katara, who made the supreme sacrifice in Kupwara in #JammuAndKashmir. We all stand with his family members in this most difficult time...May God give them strength.
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) December 25, 2019
गहलोत यांनी लिहिले की, ‘भरतपूरच्या शूर सैनिकाच्या हुतात्म्यास सलाम. जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे सर्वोच्च बलिदान करणारे सौरभ कटारा. या कठीण परिस्थितीत आम्ही सर्व आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत उभे आहोत. देव त्यांना सामर्थ्य देईल.’