Sandeep Nahar Suicide Case: संदीप नाहरच्या पत्नी आणि सासू विरोधात गुन्हा दाखल

Sandeep Nahar Suicide Case: संदीप नाहरच्या पत्नी आणि सासू विरोधात गुन्हा दाखल

सोमवारी (15 फेब्रुवारी) सुशांत सिंग राजपूत (Sushant singh Rajput) आणि अक्षय कुमार (Akshay kumar) या कलाकारांसोबत काम करणारा अभिनेता संदीप नाहार (Sandeep nahar) यांने आत्महत्या (Suicide) केली आहे.

  • Share this:

मुंबई, 17 फेब्रुवारी : सोमवारी (15 फेब्रुवारी) सुशांत सिंग राजपूत (Sushant singh Rajput) आणि अक्षय कुमार (Akshay kumar) या कलाकारांसोबत काम करणारा अभिनेता संदीप नाहार (Sandeep nahar) यांने आत्महत्या (Suicide) केली आहे. त्याच्या मृत्यूनंतर बॉलीवूडच्या अनेक बड्या कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. हमसफर है, एमएस धोनी, केसरी यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांत संदीप नाहरने भूमिका साकारली होती. सोमवारी त्याचा मृतदेह राहत्या घरी सापडला होता, त्याने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी पोलिसांनी संदीपची पत्नी कंचन शर्मा आणि सासूविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

संदीप नाहार याने आपल्या सुसाईड नोटमध्ये आपल्या वैवाहिक जीवनात असणाऱ्या अडचणींचा उल्लेख केला होता. शिवाय त्याने आत्महत्येपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ देखील पोस्ट केला होता. आता या व्हिडीओच्या आधारे मुंबई पोलिसांनी त्याची पत्नी कंचन शर्मा आणि सासूविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांच्यावर लावला आहे. याशिवाय आत्महत्येचा व्हिडीओ पाहिल्यानंतर सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी या अभिनेत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु त्याला शोधेपर्यंत संदीप नाहारने आत्महत्या केली होती.

संदीप नाहारने आत्महत्येपूर्वी आपल्या फेसबुक अकाऊंटवर सुसाइड नोट पोस्ट केली आहे. त्याने या पोस्टमध्ये लिहिलं की, 'आता जगण्याची इच्छा नाही. आयुष्यात बर्‍याचदा सुख-दु:ख पाहिलं आहे, प्रत्येक समस्याचा दटून सामना केला आहे. परंतु आज मी ज्या मानसिक स्थितीतून जात आहे, ते सहन होण्यापलिकडचं आहे. मला माहित आहे की, आत्महत्या हा भ्याडपणा आहे. मलाही जगायचं होतं पण जिथे मनाला शांतता आणि आत्मसन्मान नाही, अशा परिस्थितीत जगून काय फायदा?

(वाचा - खळबळजनक! संदीप नाहर मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट; सुसाइड नोट आणि शेवटचा VIDEO गायब)

संदीपने सुसाईड नोटमध्ये पत्नी कंचन शर्मा आणि सासू विनू शर्मा यांच्याविरूद्ध बर्‍याच गंभीर बाबी उघड केल्या आहेत. संदीपने लिहिलं की, 'कंचनशी लग्न केल्यानंतर माझं आयुष्य नरकमय झालं. कंचन आणि तिची आई छोट्या छोट्या विषयावरून मानसिक त्रास देत होते. पत्नी आणि सासूच्या त्रासाला कंटाळून संदीपने आत्महत्या केल्याचं सुसाईड नोटवरून स्पष्ट होत आहे. पण त्याच सुसाईड नोटमध्ये त्याने लिहिलं आहे की, माझ्या मृत्यूनंतर कंचनला कोणीही काहीही बोलू नका. याप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत.

Published by: News18 Desk
First published: February 17, 2021, 1:10 PM IST

ताज्या बातम्या