Home /News /maharashtra /

कोकणात गणेशोत्सवाला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 2 दिवसांत होणार निर्णय

कोकणात गणेशोत्सवाला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 2 दिवसांत होणार निर्णय

राज्य सरकारच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक अभय यावलकर यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना याबाबत पत्र लिहिले आहे.

मुंबई, 08 ऑगस्ट : कोकणच्या वाटेवर मार्गस्थ झाले असतानाच गणपती स्पेशल ट्रेन बाबत खास बातमी चाकरमान्यांना मिळण्याची शक्यता आहे. गणपतीसाठी विशेष गाड्या सोडण्याची तयारी रेल्वेने सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. राज्य सरकारच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक अभय यावलकर यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना याबाबत पत्र लिहिले आहे. या पत्राला रेल्वेकडून होकार मिळाला असून येत्या दोन दिवसांत विशेष गाड्यांबाबत अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. या गाड्यांसाठी आरक्षण असेल व तिकीट हाच ई-पास मानला जाईल. करोना साथीच्या अनुशंगाने थर्मल स्क्रीनिंग, फिजिकल डिस्टन्सिंग या सर्व बाबी काटेकोरपणे पाळल्या जातील, असेही सांगण्यात येत आहे. Air Crash: केरळ विमान दुर्घटनेतील मृतांचा आकडा 18 वर, रनवेवर नेमकं काय घडलं? या गाड्या नेमक्या कोणत्या तारखेपासून सोडल्या जाणार. या गाडीतून जाणाऱ्या प्रवाशांसाठी क्वारंटाइन कालावधी किती असणार याबाबत मात्र लवकरच स्पष्टता होणार आहे. त्यामुळे गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री यांच्यात झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. आता क्वारंटाइनचा कालावधी हा 10 दिवसांचा करण्यात आला आहे. तर सात हजार गाड्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. बुकिंग प्रमाणे गाड्या सोडल्या जाणार आहेत. मंगळवारी (4 ऑगस्ट) संध्याकाळ 6 वाजल्यापासून तिकीट बुकिंग सुरू होणार आहे. एस टी मध्ये 22 लोकांना प्रवास करता येईल. मुंबईहून थेट गावात प्रवासी जातील मध्ये कुठेही थांबणार नाहीत. जेवण स्वत:चं जेवण घेऊन प्रवास करायचा आहे. जेवणासाठी एस टी थांबणार नाही. फक्तं 2 ठिकाणी नैसर्गिक विधीसाठी बस थांबणार आहे. खासगी बस चालकांना एस. टी. पेक्षा दीड पटच दर आकारता येणार आहे. नाहीतर कारवाई करण्यात येईल. Air Crsh: भीषण अपघातात घडला चमत्कार, आणि आई-वडिलांच्या डोळ्यांना लागल्या धारा कोकणवासीयांना 12 ऑगस्टपूर्वी कोकणात पोहचावं लागेल. 12 तारखेला रात्री 12 पर्यंत पोहचतील ते होम क्वारंटाइन होतील. ज्यांना 12 तारखे नंतर जायचं असेल त्यांना 48 तास पूर्वी कोविड 19 चाचणी करावी करावी लागेल ती निगेटीव्ह आली तरच त्यांनी कोकणात जावं असाही नियम करण्यात आला आहे. दरवर्षी मुंबईतून हजारो चाकरमाने गणेशोत्सवासाठी कोकणात जात असतात. मात्र यावेळी कोरोनाचा उद्रेक असल्याने जास्त सतर्कता बाळगण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
Published by:Renuka Dhaybar
First published:

Tags: Corona

पुढील बातम्या