JOB आहे की स्वप्न! फिरण्यासाठी आणि पार्टी करण्यासाठी कंपनीच देणार 16 लाख

JOB आहे की स्वप्न! फिरण्यासाठी आणि पार्टी करण्यासाठी कंपनीच देणार 16 लाख

कोण म्हणतं कामात मजा न्हाय! तुम्ही नक्की अप्लाय करा

  • Share this:

मुंबई, 21 जानेवारी : वेगवेळ्या प्रेक्षनीय स्थळांना भेट देणं, भटकंती करणं आणि पार्टी करणं सर्वांनाच आवडतं. ज्यांना पर्यटनाची आवड असलेल्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. पर्यटनाची आवड असलेल्यांसाठी एका कंपनीनं जॉब ऑफर आणली आहे. ही कंपनी फिरण्यासाठी आणि पार्टी करण्यासाठी 16 लाख रुपये पगार सुद्धा देणार आहे. यासोबतच ही कंपनी त्यांच्या एम्प्लॉइच्या राहण्याचा आणि फिरण्याचा सर्व खर्च सुद्धा उचलणार आहे.

‘द सन’नं दिलेल्या वृत्तानुसार युकेमधील GoHen या कंपनीनं ही ऑफर दिली आहे. ही कंपनी सध्या प्रोफेशनल पार्टी टेस्टरच्या शोधात आहे. या जॉबसाठी कंपनी अशा लोकांचा शोध घेत आहे. जे लोक जगभरात फिरू शकतील वेगवेगळ्या देशात, हॉटेलमध्ये जातील तिथल्या कॅब मधून फिरतील आणि ब्राइड्ससाठी बेस्ट आयडिया शोधतील.

नोकरीसाठी इंटरव्ह्यूला जाताना सहज विसरला या गोष्टी, एकदा वाचा

या बदल्यात या लोकांना काम काय करायचं तर नवरीसाठी पार्टी प्लान करण्यासाठी तिला मदत करायची आणि तिचा स्पेशल डे आणखी खास करण्याचं काम करायचं. या जॉबचा सर्वा इंटरेस्टिंग भाग असा आहे की, या जॉबसाठी अप्लाय करण्यासाठी कोणत्याही डिग्री सर्टिफिकेटची गरज नाही. त्यामुळे ही कंपनी अशा व्यक्तीच्या शोधात आहे. ज्याला पार्टी करणं आणि अ‍ॅडव्हेंचर याची विशेष आवड आहे आणि इव्हेंट मॅनेजमेंटचा अनुभव आहे.

याविषयी बोलताना GoHenचे डायरेक्टर ऑफ ऑपरेशन्स स्टीव रोडी यांनी सांगितलं की, आम्ही या इंडस्ट्रीमध्ये ब्राइड्ससाठी बेस्ट पार्टी सेवा देण्याचं काम करतो. आमच्या या कौशल्याचा आम्हाला गर्व आहे. पण यात अधिक सुधारणा करण्यासाठी आम्ही अशा पार्टी गोअरच्या शोधात आहोत. जे आम्ही सांगितलेल्या डेस्टिनेशन्सवर जातील आणि तिथल्या हेन पार्टीमध्ये सहभागी होऊन तिथल्या सर्व अ‍ॅक्टीव्हिटी टेस्ट करतील तसेच तिथल्या लोकल्या पार्ट्यासुद्धा अटेंड करतील आणि आम्हाला त्यातील बेस्ट आयडिया सांगतील. ज्याने आम्हाला आमच्या बेस्ट सर्व्हिस देण्यात मदत होईल.

नथीचा फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल, घातल्यावर तुम्हीही दिसाल सौंदर्यवती

या जॉबसाठी ही कंपनी वर्षाला 17,000 पौंड (15.7 लाख) पगार देत आहे. तसेच कंपनी त्यांच्या एम्प्लॉइच्या राहण्याचा आणि फिरण्याचा सर्व खर्च सुद्धा उचलणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही यासाठी बेस्ट आहात तर लगेचच इथं क्लिक करा आणि अप्लाय करा. अर्जाची अंतिम तारिख 28 फेब्रुवारी 2020 आहे.

हिवाळ्यात कंबरदुखीचा त्रास पुन्हा डोकं वर काढतोय? करून पाहा हे घरगुती उपाय

First published: January 21, 2020, 1:22 PM IST

ताज्या बातम्या