हिवाळ्यात कंबरदुखीचा त्रास पुन्हा डोकं वर काढतोय? करून पाहा हे घरगुती उपाय

हिवाळ्यात कंबरदुखीचा त्रास पुन्हा डोकं वर काढतोय? करून पाहा हे घरगुती उपाय

  • Share this:

मुंबई, 20 जानेवारी: हिवाळ्यात महिला आणि तरुण मुलींमध्ये कंबर दुखण्याचे प्रमाण वाढत आहे. कॅल्शियमची कमतरता आणि वात यामुळे कंबरदुखीच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेकदा त्यासाठी डॉक्टरांकडच्या फेऱ्या वाढतात. पेनकिलर्स घेऊन साईड इफेक्टस होतात. अशा वेळी काही घरगुती,सुरक्षित उपायही आहेत.

1. तीळ अथवा बदामाच्या तेलानं पाठिला मसाज करावा. खोबरेल तेल थंड असल्यानं थंडीमध्ये वात वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे खोबरेल तेल डायरेक्ट लावू नये.

2. ते वापरायचं असेल तर तेल गरम करायचं, त्यात लसणाच्या पाकळ्या टाकायच्या. कोमट तेलानं दुखणाऱ्या भागावर मालीश करावी.

3. मिठाच्या पाण्यानं शेक द्या. गरम पाण्यात मीठ टाका. आणि पाठ,कंबर त्या पाण्यानं शेका.

4. कॉटनचा कपडा तव्यावर गरम करून त्यानं शेक देऊ शकता. किंवा गरम पाण्याची पिशवी घरी उपलब्ध असेल तर उत्तम.

5. एकसारखं एकाच स्थितीमध्ये बसून कंबर दुखायला लागते. 40 मिनिटांपेक्षा जास्त बसू नये. अनेकदा ऑफिसमध्ये अनेक तास माणसं एकाच जागी काम करत राहतात. अधेमधे उठून फेरफटका मारावा.

6. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे कंबरदुखीचा त्रास उद्भवू शकतो. आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थ जास्त असावेत. डॉक्टरांचा सल्लाही महत्त्वाचा आहे. सुका मेवा आणि गूळ, दूध, दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करावा.

7.रात्री झोपताना कंबरे खाली अथवा पाया खाली उशी घेऊन झोपावं.

8.कंबर दुखत असतांना कंबर आणि पोटांच्या खालील अवयवांचा व्यायाम करावा. पोहणे, सायकल चालवणे, फिरणे हे कंबरेसाठी उत्तम व्यायाम आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 19, 2020 10:06 PM IST

ताज्या बातम्या