मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

नथेचा फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल, घातल्यावर तुम्हीही दिसाल सौंदर्यवती

नथेचा फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल, घातल्यावर तुम्हीही दिसाल सौंदर्यवती

सर्वाना लग्नाची तयारी परफेक्ट हवी असते. त्यात सगळ्यात महत्त्वाचा आहे तो मेकअप. आता मेकअप आला म्हणजे त्यानुसार ज्वेलरी आलीच.

  • Published by:  Renuka Dhaybar
मुबंई 18 जानेवारी : लग्नाच्या दिवशी सुंदर दिसणं हे प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं ते सुद्धा लहानपणापासूनचं. सर्व मुली लग्नाच्या दिवशी सुंदर दिसण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतात. लग्नाची तयारी म्हटलं की सगळ्यात मोठा साज असतो तो नवरीचा. तिच्या साडीपासून ते लेहंग्यापर्यंत, मेहंदी ते केसांच्या स्टाईलपर्यंत सगळं कसं निराळं असतं. हल्ली तर फॅशनची व्याख्यासुद्धा बदलली आहे. त्यामुळे सुंदर दिसणं हा अगदी महत्त्वाचं झालं आहे. सर्वाना लग्नाची तयारी परफेक्ट हवी असते. त्यात सगळ्यात महत्त्वाचा आहे तो मेकअप. आता मेकअप आला म्हणजे त्यानुसार ज्वेलरी आलीच. मार्केमध्ये मेकअप आणि महिलांच्या ज्वेलरीला जास्त डिमांड आहे. त्यात सध्या ट्रेंडमध्ये आहे ती नथ. नवरी म्हटलं आणि नाकात साजेशी नथ नसेल असं होणारच नाही.
गेल्या काही दिवसांमध्ये नथेच्या काही डिझाइन्स आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तरुणाईसुद्धा या ट्रेंडला पसंती देत आहे. नथ महिलेचं सौंदर्य वाढवते. जुना काळ आठवला तर मोठ्या आकाराच्या नथ सगळ्यांना आठवतील. पण काळानुसार, नथेच्या डिझाइन्स बदलल्या. आता बाजार भिन्न प्रकारच्या नथ आहेत.
तुम्ही जर घागरा घातला असेल, तर साधीशी सुंदर नथ त्या घागऱ्यावर शोभून दिसते आणि त्या लूकला आणखी सुंदर बनवते. लग्नात जर बंगाली लूक पाहिजे असेल तर ह्लकी क्राफ्टवर्कची नथ घातल्यास खूप छान लूक दिसतो.  लटकणारी नथ घालण्याचा सध्या ट्रेंड सुरू आहे. या नथेवर सुंदरशी डिझाइन असते.
राजस्थानी आणि मारवाडी संस्कृतीत नवरी जडाऊवाली नथ घालते. जडीवाली नथ घातल्याने नवरीचा लूक आणखी खुलून दिसतो. लग्नात कधी कधी मोठी आणि वजनदार नथ घातल्याने त्रास होतो त्यामुळे लहानशी नथ फार सुंदर दिसते. मराठमोळ्या लग्नात साडीवर नवरीने नथ घातल्यास तिचा लूक खुलून दिसतो.
First published:

पुढील बातम्या