पुण्यात आता देवच नाही सुरक्षित, पुन्हा एकदा समोर आला धक्कादायक प्रकार

लॉकडाऊनचा फायदा घेत चोरटे मंदिरामधील दागिन्यांवर डल्ला मारतानाचं उघड होत आहे.

लॉकडाऊनचा फायदा घेत चोरटे मंदिरामधील दागिन्यांवर डल्ला मारतानाचं उघड होत आहे.

  • Share this:
जुन्नर, 27 ऑगस्ट : राज्यात लॉकडाऊन असल्याने मंदिरं बंद आहेत आणि याच गोष्टीचा फायदा घेत चोरटे मंदिरामधील दागिन्यांवर डल्ला मारतानाचं उघड होत आहे. जुन्नर तालुक्यातील पूर्व पट्ट्यात असलेल्या आणे गावात कालिका माता मंदिरात भरदिवसा चोरी करत चोरट्यांनी दागिने लंपास केले आहेत. बरोबर महिनाभरापूर्वी ओझरच्या विघ्नहर गणपती मंदिरात चोरी झाली होती. त्यानंतर काल पुन्हा आणे इथल्या कालिका माता मंदिरात चोरी झाल्याने राज्यातील देव सुरक्षित नसल्याचं अधोरेखित झाले आहे. आता महाराष्ट्रात घेऊ शकता स्वस्तात घरं, ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय मिळालेल्या माहितीनुसार, देवीच्या अंगावरचे दागिने आणि मुकुट चोरीला गेला आहे. कालिका देवीचे पुजारी साईनाथ सासवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार दि. 25 रोजी दुपारच्या सुमारास आणे इथल्या खालच्या पेठेत असलेल्या कालिका देवीच्या मंदिरात प्रवेश करून देवीचा 1 किलो 200 ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट व देवीच्या गळ्यातील एक तोळे वजनाचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे. 'साताऱ्यात निवडून येण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांना शरद पवारांची मदत घ्यावी लागते' मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार व गाभारा अशा दोन्ही दरवाजांना असलेली कुलपं शाबूत असून चोरट्याने गाभाऱ्याला असलेल्या झरोक्यातून आत प्रवेश करून चोरी केल्याचे साईनाथ सासवडे यांनी सांगितले. मंदिराच्या विश्वस्त मंडळाने पोलिसात तक्रार दिली असून आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली असून पुढील तपास करत आहेत.
Published by:Renuka Dhaybar
First published: