बुलडाणा, 10 जुलै : बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील बोरजवळा एका नदीजवळ कापडामध्ये एक अर्भक आढळून आल्यामुळे एकच उडाली होती. पण, त्याहुन धक्कादायक म्हणजे, जेव्हा या अर्भकाचे शवविच्छेदन करण्यात आले होते, तेव्हा डॉक्टरांना हसावं की रडावं अशी अवस्था झाली होती. कारण, ज्या अर्भकाचे शवविच्छेदन करण्यात आले ती एक बाहुली होती.
घडलेली हकीकत अशी की, जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील बोरजवळा येथील नदीमध्ये गुरुवारी सायंकाळी स्त्री जातीचे नवजात अर्भक मिळल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली. गावकऱ्यांनी पोलीस पाटलांसह घटनास्थळ गाठीत मृत अर्भक असल्याची खात्री केली. यांनतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करून मृत अर्भक ताब्यात घेऊन त्याला खामगाव येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन कक्षात दाखल केले. तशी 174 नुसार नोंद ही पोलीस दप्तरी दाखल करण्यात आली.
मात्र, डॉक्टरांनी जेव्हा ते बालक हात लावून शवविच्छेदण्यासाठी पाहिले असता ते नवजात बालक नसून एक बाहुला असल्याचे समोर आले आहे. शवविच्छेदनात अर्भकाच्या पोटातून कापसाचे बोळे निघत असल्याने डॉक्टरांची एकच तारांबळ उडाली. मात्र, काही वेळातच अर्भक समजून आणलेले मृतदेह नसून बाहुले असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला.
पण, या प्रकारामुळे प्रचंड खळबळ उडाली. पिंपळगाव राजा पोलिसांनी पंचनामा कसा आणि काय केला? घटनास्थळाची नेमकी काय पाहणी केली, पंचनामा करताना कोणत्या बाबी उलगडा करण्यात आला. याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत आहे.
भुसावळमध्ये भर रस्त्यावर आले नाग-नागिणी, पाहा हा VIDEO
फक्त कोरोनामुळे कोणी कोणाला हात लावत नसल्यामुळे या नवजात बालकांच्या बाबतीत सुद्धा असे घडले असावे असे प्राथमिकरीत्या समोर आले आहे. मात्र ते नवजात बालक नसून ती एक बाहुली असल्याची खामगाव सामान्य रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सांगण्यात आले आहे.
त्या बालकाला नवजात अर्भक म्हणून नाही तर ती एक बाहुली आहे, असं आता सुद्धा रुग्णालय सूत्रांनी सांगितले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.