माणुसकीला सलाम! मुंबईत महिला पोलिसाने एकाच दिवशी केले 4 मृतदेहांवर अंत्यसंस्कार
माणुसकीला सलाम! मुंबईत महिला पोलिसाने एकाच दिवशी केले 4 मृतदेहांवर अंत्यसंस्कार
शाहूनगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या मृत्यूनंतर संपूर्ण पोलीस स्थानक हादरल आहे. अशात एका महिला पोलिसाने माणुसकी जोपासा एकाच दिवशी 4 बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत.
मुंबई, 21 मे : राज्यात सध्या कोरोनाचा कहर सुरू आहे. अशात सर्व अत्यावश्यक सेवा या रोगाचा सामना करण्यासाठी लढत आहे. आपल्या जीवाची परवा न करता देशासाठी लढणाऱ्या पोलीस, डॉक्टर, नर्स, सफाई कामगार अशा अनेकांच्या प्रेरणादायी कहाण्या आपण पाहिल्या. पोलीस खात्यातून अशीच एक कहाणी समोर आली आहे. खरंतर शाहूनगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या मृत्यूनंतर संपूर्ण पोलीस स्थानक हादरल आहे. अशात एका महिला पोलिसाने माणुसकी जोपासा एकाच दिवशी 4 बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत.
महिला पोलीस अंमलदार संध्या शीलवंत असं त्यांचं नाव आहे. संध्या यांनी एकाच दिवशी 4 बेवारस मृतदेहांवर अंत्यस्कार करत माणुसकीचा एक वेगळा धर्म जगासमोर मांडला आहे. एकीकडे कोरोनाच्या संसर्गामुळे लोक आपल्या सख्खा माणसांनाही विचारत नसताना दुसरीकडे संध्या यांनी केलेल्या कामाचं करावं तितकं कौतूक कमी आहे. सामाजिक बांधिलकी असली की भीतीचे दरवाजे बंद होतात असं संध्या यांनी माध्यमांना सांगितलं.
मिळालेल्या माहितीनुसार, विक्रोळीमध्ये पती, 13 वर्षाची मुलगी, 9 वर्षाचा मुगला आणि सासू सासरे असं संध्या यांचं कुटुंब आहे. संध्या या शाहूनगर पोलीस ठाण्यात एडीआर कारकून म्हणून कार्यरत आहे. या लॉकडाऊन दरम्यान, त्यांनी एकूण 6 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहे. त्यांच्या या कर्तव्यामुळे सर्व स्तरातून त्यांचं कौतूक होत आहे.
सासूनं गरम चपाती वाढली नाही म्हणून संतापला जावई, उचललं 'हे' भयंकर पाऊल
संध्या या एडीआर (मृतदेहांची नोंद करण्याचे कामकाज)चं काम करण्यासोबतच मृतांच्या कुटुंबाचाही शोध घेतात. पण सध्या लॉकडाऊनमध्ये कोणीही मृतदेह घेण्यासाठी आलं नसल्याने त्यांनी स्वत: मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. यातील एक मृतदेह कोरोना रुग्णाचा असल्याचंही सांगण्यात येत आहे.
सायन रुग्णालयातील मृतदेहांच्या शेजारी उपाचार सुरू असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत असताना संध्या यांनी त्याच दिवशी 4 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. लॉकडाऊनच्या काळात 6 मृतदेहांवर त्यांनी अंत्यसंस्कार केले आहेत. आपलं कुटुंब आणि घरातील सासू-सासऱ्यांच्या सहकार्यामुळे हे सगळं करणं शक्य असल्याचं संध्या म्हणाल्या. आपल्या देशाच्या हितासाठी लढणाऱ्या आणि माणुसकीची मशाल अशीच पेटवत ठेवणाऱ्या संध्या यांना सलाम.
संपादन - रेणुका धायबर
Published by:Manoj Khandekar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.