जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन, काँग्रेस नगरसेवकावर गुन्हा दाखल; मुलाच्या लग्नाची पार्टी भोवली

लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन, काँग्रेस नगरसेवकावर गुन्हा दाखल; मुलाच्या लग्नाची पार्टी भोवली

Prayagraj: A graffiti on a road informs passersbies to follow lockdown guidelines during the nationwide lockdown to curb the spread of coronavirus, in Prayagraj, Friday, April 17, 2020. (PTI Photo)(PTI17-04-2020_000051B)

Prayagraj: A graffiti on a road informs passersbies to follow lockdown guidelines during the nationwide lockdown to curb the spread of coronavirus, in Prayagraj, Friday, April 17, 2020. (PTI Photo)(PTI17-04-2020_000051B)

या नेत्याच्या पार्टीला तीनशेहुन अधिक पुढारी, अधिकारी आणि गावातील प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित असल्याचा आरोप केला जात आहे. त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

निलेश पवार, नंदुरबार 11 जून: नंदुरबारमधले काँग्रेसचे नगरसेवक खान परवेज करामतभाई यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी लॉकडाऊनचे सर्व नियम पायदळी तुडवत  आपल्या मुलाच्या लग्ना प्रित्यर्थ  जंगी पार्टी दिली होती. त्यांच्यावर  परवेझ खान यांच्यावर १८८,२६८,२६९,२९० आपत्ती व्यवस्थापन कायदा  २००५ चे कलम ५४ व साथरोग अधिनियम  १८९७ ते कलम ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सारे प्रकरण बाहेर आल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी प्रांतअधिकारी, तहसिलदार आणि पोलीस निरीक्षक यांची चौकशी समिती गठीत केली होती. त्यात ते दोषी आढळले आहेत. त्यांनी 50 पेक्षा जास्त लोकांना निमंत्रित केल्याचं चौकशी समितीला आढळून आलं आहे. या नंतर आज तहसिलदार नंदुरबार यांनी स्वत: तालुका पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या पार्टीतील खानसामाच कोरोना बाधित निघाला होता. हे प्रकरण समोर आल्याने पार्टीला उपस्थिती लावणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांसह अनेक अधिकारी आणि प्रतिष्ठीत संशयाच्या जाळ्यात अडकले आहेत. नंदुरबारचे काँग्रेस नगरसेवक खान परवेज करामतभाई यांनी ही पार्टी रविवारी दिली होती. हे वाचा -   VIDEO: मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल करामतभाई यांनी जिल्ह्यातील एका बड्या नेत्याच्या फार्म हाऊसवर आपल्या मुलाच्या लग्नाच्या आनंदान पार्टीचे आयोजन केले होते. मात्र या पार्टीतील खानसमाच कोरोना बाधित निघाल्याने या आनंदानावर विर्जन पडले. त्यामुळे ही पार्टी चौकशीच्या भोवऱ्यात सापडली होती. हे वाचा - COVID-19: मुंबईतील 11 लाख घरं सील, 50 लाख लोकांना बाहेर पडण्यास मज्जाव विशेष म्हणजे नियमांचं उल्लंघन करत  या नेत्याच्या पार्टीला तीनशेहुन अधिक पुढारी, अधिकारी आणि गावातील प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आता या अधिकारी आणि नेते मंडळीवर कारवाई होते का याकडे सगळ्यांचं लक्ष  लागलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात