मुंबई, 11 जून : मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये भीषण आग लागली आहे. या मार्केटच्या तळमजल्यावर आगीने पेट घेतला असल्याची माहिती देण्यात आली आहे. सव्वा सहाच्या सुमारास आग लागल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, ही आग नेमकी कशी लागली याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आली नसून पोलीसदेखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. या मार्केटमध्ये अनेक छोटी दुकानं असून यामध्ये मोठ्या प्रमाणात माल भरलेला असतो. त्यामुळे एकूण काय नुकसान झालं याबद्दल अद्याप काहीही माहिती हाती आलेली नाही.
मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये भीषण आग pic.twitter.com/Lc1X8vMojh
— Renuka Dhaybar (@renu96dhaybar) June 11, 2020
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून आग विझवण्याचं काम सुरू आहे. कोणी आतील दुकानांमध्ये अडकलं तर नाही याचाही शोध घेण्याचं काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. संकलन आणि संपादन - रेणुका धायबर