मराठी बातम्या /बातम्या /देश /धोकादायक इशारा! मे महिन्यात आणखी वाढू शकतो कोरोनाचा कहर

धोकादायक इशारा! मे महिन्यात आणखी वाढू शकतो कोरोनाचा कहर

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असताना एक धोकादायक इशारा मिळाला आहे.

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असताना एक धोकादायक इशारा मिळाला आहे.

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असताना एक धोकादायक इशारा मिळाला आहे.

निखिल नारायण (प्रतिनिधी)

नवी दिल्ली, 8 मे: देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असताना एक धोकादायक इशारा मिळाला आहे. मे महिन्यात कोरोनाचा कहर आणखी वाढू शकतो, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. देशभरात 2 ते 5 मेच्या दरम्यान कोरोनाचे 12,235 नवे रुग्ण आढळले आहेत. तर या चार दिवसांत 452 जणांचा मृत्यू झाला आहे. म्हणजे 2 ते 5 मेच्या दरम्यान सरासरी दररोज 3059 नवे रुग्ण समोर आले आहेत तर 113 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण 52,952 जण कोरोनाबाधित आहेत. आतापर्यंत कोरोनाने 1,783 जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा..मुंबईतल्या सर्वात मोठ्या तुरुंगातही पसरला कोरोना; राज्यात आज 1362 रुग्ण

4-5 मेला 24 तासांत कोविड-19 (Covid-19)चे 3,875 नवे रुग्ण सापडले. तर 194 जणांचा मृत्यू झाला. या एका दिवसांत देशात सर्वाधिक नवे रुग्ण समोर आले. या काळात कोरोनाचा संसर्ग वाढीचा वेग 34.07 टक्के होता. ही चिंताजनक बाब आहे. मे महिन्यात हा वेग दुप्पट होईल, अशी शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. गेल्या आठवड्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याचं समोर आलं आहे. लॉकडाऊन-2 संपुष्टात येण्याच्या दोन दिवस आधीच म्हणजे एक मे रोजी कोरोनाबाधित रुग्णांमध्ये 9 टक्क्याने वाढला होता.

गेल्या काही महिण्यात राज्यात कोरोनाचे रुग्ण आणि मृतांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. मुंबईसह पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 16 हजारांवर पोहोचला आहे. महाराष्ट्रात 36 पैकी 34 जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पसरला आहे. दुसरीकडे तमिलनाडुमध्ये बुधवारी 771 रुग्ण आढळले. 24 तासांतील ही सर्वाधिक वाढ आहे. गुजरातमध्ये मंगळवारी 441 आणि दिल्लीत बुधवारी 428 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

काय म्हणाले तज्ज्ञ...

यूनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँगचे एपिडमियोलॉजिस्ट डॉ. बेन काउलिंग यांनी सांगितलं की, लॉकडाऊन संपल्यानंतरही आशिया खंडातील देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरु शकतो. याच्या मागे दोन कारणे आहेत. लॉकडाऊन संपताच लोक मोठ्या संख्येने घराबाहेर पडतील आणि एकमेकांच्या संपर्कात येतील. तर दूसरे कारण म्हणजे, आंतरराष्ट्रीय प्रवाशांमुळे कोरोनाचा संसर्ग आणखी वाढू शकतो.

देशात लॉकडाऊन नसतं तर... 

जगभरात कोरोना संक्रमणाची संख्या 38 लाखांच्या पुढे गेली आहे तर दोन लाखांपेक्षा जास्त लोक मरण पावले आहेत. भारतातील कोरोना संक्रमणाची संख्या 52 हजाराच्यावर गेली आहे. कोरोना विषाणूमुळे जगातील बऱ्याच देशांत लॉकडाऊन आहे परंतु लॉकडाऊन झाले नाही तर काय होईल? त्याबद्दल विचार करणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय लोकसंख्येच्या संस्था (आयआयपीएस) चा अहवाल समोर आला आहे.

मुंबईच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेसने (आयआयपीएस) केलेल्या अहवालात असे म्हटले गेले आहे की भारतात लॉकडाऊन नसते तर सुमारे 43 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असती आणि जवळजवळ 33 हजार लोकांचा मृत्यू झाला असता. या संशोधनासाठी पुनरुत्पादन क्रमांक (आर वो ) स्केल वापरला गेला. लॉकडाउनपूर्वी आर वोची गणना 2. 56 होती, जी लॉकडाऊन नंतर 1. 16 झाली होतीआहे.

First published:
top videos