मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

पुण्यातील शिक्षकाचं धक्कादायक कृत्य, विद्यार्थिनींच्या छाती, मांडीला केला स्पर्श अन्...

पुण्यातील शिक्षकाचं धक्कादायक कृत्य, विद्यार्थिनींच्या छाती, मांडीला केला स्पर्श अन्...

महापालिकेच्या शाळेत पीटी क्लास घेण्यासाठी कंत्राटी पद्धतीने एक शिक्षक नेमण्यात आले होते.

महापालिकेच्या शाळेत पीटी क्लास घेण्यासाठी कंत्राटी पद्धतीने एक शिक्षक नेमण्यात आले होते.

महापालिकेच्या शाळेत पीटी क्लास घेण्यासाठी कंत्राटी पद्धतीने एक शिक्षक नेमण्यात आले होते.

  • Published by:  News18 Desk
पुणे, 10 जुलै : राज्यात दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. (Crime News in Maharashtra) त्यातच पुण्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. (Pune Crime News) शिक्षक आणि विद्यार्थ्याचे नाते हे पवित्र नाते असते. मात्र, या नात्याला एका शिक्षकाने काळिमा फासल्याचा प्रकार समोर आला. (Teacher Physical Abused with Girls) ही घटना 29 जून ते 5 जुलैदरम्यान महात्मा फुले पेठेतील एका शाळेत घडली आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी कारवाई करत आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले आहे. (Khadak Police Station) काय आहे प्रकरण - महापालिकेच्या शाळेत पीटी क्लास (PT Class Teacher Pune) घेण्यासाठी कंत्राटी पद्धतीने एक शिक्षक नेमण्यात आले होते. या नेमलेल्या शिक्षकानेच अनेक अल्पवयीन मुलींची लैंगिक छळवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोहंमद कय्युम अन्सारी (वय 18, रा. कोंढवा खुर्द), असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मिळालेली माहिती अशी की, महापालिकेच्या एका शाळेत मोहंमद अन्सारी याला कंत्राटी पद्धतीने पीटी क्लास घेण्यासाठी नेमण्यात आले होते. मात्र, विद्यार्थिनींसोबत या ठिकाणी धक्कादायक प्रकार घडला. आरोपी शाळेतील 12 ते 16 वर्षाच्या मुलींना पीटी शिकवताना वाईट हेतूने तो खांद्यावर, छातीवर, मांडीवर स्पर्श करायचा. तसेच अश्लील भाषा वापरून, घाणेरड्या नजरेने पाहून मुलींची वेळोवेळी लैंगिक छळवणूक करायचा. मुलींना धमकीही दिली - आरोपीने मुलींचा लैंगिक छळ केल्यानंतर कोणाकडे तक्रार करायची तर करा; मी कोणाला घाबरत नाही, अशी धमकीही मुलींना त्याने अनेकदा दिली होती. अखेर या मुलींनी मुख्याध्यापकांकडे या संपूर्ण प्रकाराबाबत आरोपीची तक्रार केली. यानंतर मुख्याध्यापकांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. हेही वाचा - पुण्यात भरदिवसा तरुणाचा खून; जुन्या भांडणातून तुषार भोसलेला क्रूरपणे संपवलं मुख्याध्यापक यांनी खडक पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि या प्रकरणाची तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी मोहंमद कय्युम अन्सारी त्याला अटक केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक म्हस्के करत आहेत.
First published:

Tags: Pune, Pune crime news

पुढील बातम्या