पुणे, 9 जुलै : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पूर्ववैमनस्यातून भांडण झाल्यावर एकाची हत्या (Murder in Pune) करण्यात आली आहे. विश्रांतवाडीत ही घटना घडली. (Vishrantwadi Pune Murder News) या घटनेत एका तरुणावर चाकून वार केल्याची त्याचा मृत्यू (Death) झाला आहे. तुषार जयवंत भोसले (वय २८, रा. दांडेकर पुल), असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. मात्र, या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - ही घटना पुण्यातील (Pune) विश्रांतवाडी परिसरातील वडारवस्ती येथे घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तुषार हा सध्या दांडेकर पुलावर राहत होता. मात्र, तो लहानपणी विश्रांतवाडीत रहात होता. येथे त्याचा मामा राहतो. आरोपीबरोबर त्याची लहानपणापासून ओळख आहे. अनेकदा तुषार मामाकडे येत असे. यावेळी त्यांच्यात एकमेकांकडे पहाण्यावरुन भांडणे झाली होती. नेहमीप्रमाणे तुषार हा बुधवारी संध्याकाळी विश्रांतवाडी येथील वडार वस्तीत आला होता. यावेळी जुन्या भांडणावरुन त्यांच्यात पुन्हा वाद झाला. तेव्हा आरोपींनी त्यांच्या पोटात चाकूने वार केले. त्यात गंभीर जखमी झालेल्या तुषार याला तातडीने ससून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. हेही वाचा - चारित्र्याच्या संशयावर पत्नीची क्रूरपणे केली हत्या; पुण्याच्या कारागृहात आल्यानंतर पतीचाही मृत्यू दरम्यान, घटनेची माहिती मिळताच. सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच पोलीस उपनिरीक्षक लहु सातपुते अधिक तपास करीत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.