मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

बापाचा खांदाच झाला लेकीची तिरडी; कोरोना अजून किती अंत पाहणार? भयावह VIDEO

बापाचा खांदाच झाला लेकीची तिरडी; कोरोना अजून किती अंत पाहणार? भयावह VIDEO

सुरुवातीला प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे तिला सुविधा मिळाल्या नाहीत, त्यानंतर समाजातील कोणीच तिला खांदा द्यायलाही पुढे आलं नाही.

सुरुवातीला प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे तिला सुविधा मिळाल्या नाहीत, त्यानंतर समाजातील कोणीच तिला खांदा द्यायलाही पुढे आलं नाही.

सुरुवातीला प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे तिला सुविधा मिळाल्या नाहीत, त्यानंतर समाजातील कोणीच तिला खांदा द्यायलाही पुढे आलं नाही.

  • Published by:  Meenal Gangurde

जलंदर, 16 मे : कोरोना महासाथीच्यासमोर केवळ आरोग्य व्यवस्थाच नाही तर माणुसकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लोक घाबरत आहेत. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत की, ज्यात कुटुंबीयांनी आपल्या संसर्ग झालेल्या रुग्णांना बेवारस सोडलं. अशीच एक घटना पंजाबमधील जलंधरमध्ये घडली आहे. येथे 11 वर्षांच्या मुलीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सुरुवातीला प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे तिला सुविधा मिळाल्या नाहीत, त्यानंतर समाजातील कोणीच तिला खांदा द्यायलाही पुढे आलं नाही. शेवटी म्हाताऱ्या बापाने मुलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन अनेक किलोमीटर पायी चालत स्मशानात पोहोचवलं.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनात गोंधळ उडाला. कोरोना महासाथीमध्ये कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी ही प्रशासनाची असणार आहे. मात्र रुग्णाचा मृतदेह स्मशानभूमीपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी कुटुंबीयांची असेल, असेही सांगितले जात आहे. मृत सोनूचे वडील दिलीप कुमार यांनी सांगितलं की, सिव्हिल रुग्णालय जलंदरमधून त्यांच्या मुलीला अमृतसर येथे रेफर करण्यात आलं होतं. सुरुवातील रक्ताच्या एका बाटलीसाठी त्यांच्याकडून 4500 रुपये घेण्यात आले होते आणि मुलीच्या निधनानंतर रुग्णवाहिकेच्या नावावर 2500 रुपये आकारण्यात आले. मात्र त्यांना कोणतीही सुविधा देण्यात आली नाही.

हे ही वाचा-कोरोनाने जिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न हिरावलं; UPSC पास झालेल्या तरुणाचा मृत्यू

दिलीप यांनी सांगितलं की, जेव्हा ते घरी पोहोचले तेव्हा कोणीच मुलीला हात लावायला पुढे आलं नाही. त्यानंतर मीच तिला खांद्यावर घेऊन स्मशानभूमीपर्यंत घेऊन गेलो. त्याचा व्हिडिओ समोप आल्यानंतर मात्र प्रशासनाला जाग आली.

First published:

Tags: Corona patient, Corona spread