अशाप्रकारे तारक मेहतासाठी आता तुम्ही निवडू शकता दया बेन

अशाप्रकारे तारक मेहतासाठी आता तुम्ही निवडू शकता दया बेन

आम्हाला या व्यक्तिरेखेसाठी सर्वोत्कृष्ट कलाकार हवा. दयाबेन या मालिकेची हिरोइन आहे. जर ती परत येतेय तर सोन्याहून पिवळं होईल.

  • Share this:

मुंबई, 5 मे- सब टीव्हीवरील 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेत दयाबेन कोन होणार हा जणू आता राष्ट्रीय प्रश्नच झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मागचं कोडं काही केल्या सुटत नाही. कधी दिशा वकानी परत येतेय अशा बातम्या येतात तर कधी दुसऱ्या दयाबेनचा शोध निर्मात्यांनी सुरू केला असंही समोर येतं. पण आता एक नवीन अपडेट समोर येत आहे.

आता असं म्हटलं जातंं आहे की मालिकेसाठी नवीन दयाबेन मेकर्स न निवडता सर्वसामान्य प्रेक्षकच निवडणार आहेत. ऑनलाइन मतदानामार्फत मालिकेत कोण दयाबेन होणार याचा निर्णय घेण्यात येणार आहे. ज्या अभिनेत्रीला सर्वाधिक मतं मिळतील तिलाच दयाबेनची भूमिका साकारायला मिळणार आहे.

हनीमूनला पॅरिसला जातो सांगून शाहरुख या ठिकाणी घेऊन गेला गौरीला, स्वतः केला खुलासा

तारक मेहताचे निर्माते असित मोदी यांनी झूम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, ‘आता दयाबेनबद्दल बोलणं थोडं कठीण आहे. मी प्रेक्षकांनाही दयाबेन कोण हवी आहे हे विचारणार आहे. यावर सध्या काम सुरू आहे. आम्ही जो काही निर्णय घेऊ प्रेक्षकांना तो मान्य असेल. यात थोडा वेळ लागेल.

‘या बाईने माझ्या भावाला फसवलंय’, मान्यतासाठी प्रियाने संजय दत्तला सुनावलं

या पुढचेही काही एपिसोड दयाबेनशिवाय प्रेक्षकांना पाहावे लागतील. मी आता एवढं नक्कीच सांगेन की मालिकेत दयाबेन नक्की येईल. आम्हाला या व्यक्तिरेखेसाठी सर्वोत्कृष्ट कलाकार हवा. दयाबेन या मालिकेची हिरोइन आहे. जर ती परत येतेय तर सोन्याहून पिवळं होईल.’

‘आता सगळं लीगल आहे’, म्हणत या अभिनेत्रीने केलं दुसऱ्या अभिनेत्रीला प्रपोज

दिशा यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता असित म्हणाले की, ‘मी तिलाही मालिकेत परतण्याचा आग्रह करत आहे. आमच्या प्रेक्षकांनाही हेच हवं आहे. हा शो फक्त आमचाच नाहीये तर प्रेक्षकांचाही आहे.’

VIDEO: 'त्या' बोल्ड दृश्याबद्दल प्रिया बापटनं अखेर मौन सोडलं

First published: May 5, 2019, 4:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading