सध्या सोशल मीडियावर लोकं कशी वागतील याचा कोणताच थांगपत्ता लागत नाही. सेलिब्रिटी तर कौतुकापेक्षा ट्रोल होतानाच जास्त दिसतात. तर काही आपली प्रसिद्धी यातून कशी होईल याकडे पाहतात. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वात बोल्ड अभिनेत्री अशी ओळख असलेल्या चार्मी कौरनेही असंच काहीसं केलं आहे.
सध्या ती एका फोटोमुळे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. चार्मीने त्रिशासोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोत चार्मी त्रिशाला किस करताना दिसतेय तसेच चार्मीने कॅप्शनमध्ये तिने त्रिशासाठी असलेल्या मनातल्या भावनाही मांडल्या आहेत.
दोघींच्या बोल्ड प्रणयदृश्यांचा व्हिडिओ व्हायरल; प्रिया बापटच्या 'त्या' सीनची चर्चा
‘मला माहीत होतं की ती मुलगी योग्य नाही,’ जेव्हा रणबीरच्या रिलेशनशिपवर बोलल्या नीतू कपूर
'बेबी आज आणि नेहमीच माझं तुझ्यावर प्रेम असणार आहे. मी गुडघ्यावर बसले आहे आणि तू माझं प्रपोज स्वीकारण्याची वाट पाहतेय. चल लग्न करूया.. आता तर गोष्टी लीगलही झाल्या आहेत.' या फोटोमधलं दोघांचं बॉण्डिंग स्पष्ट दिसतंय. चार्मीच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतली बोल्ड अभिनेत्रींमध्ये तिचं नाव आवर्जुन घेतलं जातं. चार्मीने आतापर्यंत तेलगू, कन्नड आणि हिंदी भाषिक सिनेमांमध्ये काम केलं आहे.
VIDEO VIRAL प्रियांका चोप्रा झाली सोफी टर्नरची ब्राइड्समेड; लग्नात केला धमाल डान्स