स्वित्झर्लंड, 15 फेब्रुवारी : पोटामध्ये चाकू घुसला तर एखाद्या व्यक्तीला गंभीर दुखापत होते किंवा त्याचा मृत्यू होतो. पण पोटात चाकू घुसूनही 82 वर्षांच्या आजींचे प्राण वाचल्याची घटना समोर आली आहे. स्विर्त्झलंडमध्ये ही घटना घडली असून गार्डनिंगचे काम करत असताना आजी घसरुन पडल्या आणि त्यांच्या पोटामध्ये 18 सेंटीमीटर लांबीचा चाकू घुसला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पोटामध्ये चाकू घुसूनही रक्तस्राव झाला नाही. आजींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. शस्त्रक्रिया करुन त्यांच्या पोटातून चाकू बाहेर काढण्यात आला. सध्या आजींची प्रकृती चांगली आहे. आजींच्या पोटात चाकू घुसल्याचा फोटो EJVES फोरमने आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये संपूर्ण चाकू त्यांच्या पोटात घुसल्याचे दिसत आहे. हा फोटो पाहून कोणालाही धक्का बसेल कारण चाकू पोटात घुसूनही रक्तस्राव होताना दिसत नाहीये. चाकू घुसल्यामुळे आजींच्या पोटाच्या आतल्या भागामध्ये किती गंभीर दुखापत झाली आहे हे पाहण्यासाठी डॉक्टरांनी त्यांच्या पोटाची कॉम्प्यूटेड टोमोग्राफी एन्जीयोग्राफी केली. यामधून डॉक्टरांच्या हे लक्षात आले की त्यांच्या पोटाचा काही भाग, डिओडिनम L4-L5 या पाठीच्या मणक्यापर्यंत आणि हृदयापर्यंत रक्त वाहून नेणाऱ्या मुख्य रक्तवाहिनीवर (महाधमनी) परिणाम झाला होता.
(वाचा - आधी धुर सोडला नंतर अख्खा गिळला, माशाच्या शिकारीचा आतापर्यंत न पाहिलेला VIDEO )
याव्यतिरिक्त, आजींच्या पोटातील महाधमनीला (हृदयापर्यंत रक्त वाहून नेणाऱ्या रक्त वाहिन्यांपैकी एक) गंभीर दुखापत झाली होती. EJVES व्हॅस्कुलर फोरममध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, बऱ्याचदा महाधमनीला दुखापत झाल्यामुळे (आजींना दुखापत झाल्याप्रमाणे) लोकांचा मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. अशाप्रकारची दुखापत एकतर बंदुकीच्या गोळीमुळे किंवा पोटामध्ये चाकू भोसकल्यामुळे होते. लेखिका अनिया रस्का आणि त्यांच्या टीमने पेपरमध्ये लिहिले आहे की, ‘महाधमनीच्या संक्रमणांसोबत सब-डायाफ्रॅमॅटिक महाधमनीमध्ये जखम होणे क्वचितच होते. यामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू होतो. ’ या प्रकरणामध्ये आजीची प्रकृती एकदम स्वस्थ होती. त्या त्यांच्या गार्डनमध्ये घसरुन खाली पडल्या आणि त्यांच्या पोटात चाकू घुसला. चाकूचा दांडा सोडला तर संपूर्ण चाकूच आजींच्या पोटाच्या आतमध्ये घुसला होता असं ट्वीटरवर प्रसिद्ध झालेल्या फोटोमध्ये दिसतंय. चाकू पोटात घुसताना आजींचे ब्लड प्रेशर, ब्लड काऊंट आणि न्युरोलॉजिकल फंक्शन्स चांगल्या स्थितीत होते. पण त्यांच्या पोटाच्या आतील भागांना गंभीर दुखापत झाली आहे.
(वाचा - 8 दिवसांच्या जुळ्या बहिणींना माकडांनी उचलून नेलं; नाल्यात फेकल्याने एकीचा दुर्देवी मृत्यू )
No, this is not Halloween.
— EJVES (@EJVES_ESVS) February 7, 2021
Believe it or not, it is a Swiss gardening accident...
Read all about it #openaccess in #EJVESforum
"A Gardening Session Turns Into a Life Threatening Aortic Transection" by A. Raszka et al.https://t.co/qQ8FdEUeuG pic.twitter.com/FHiRYeyvLd
आजींच्या पोटामध्ये घुसलेला चाकू काढण्यासाठी त्यांचे संपूर्ण पोट फाडावे लागले होते. पोटात चाकू घुसताना जरी रक्तस्राव झाला नसला तरी चाकू पोटातून बाहेर काढताना रक्तस्राव होऊ शकतो. त्यामुळे शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांनी आजींच्या महाधमनीवर नियंत्रण ठेवत चाकू बाहेर काढला. चाकू घुसल्याने आजींच्या पोटाच्या आतमध्ये झालेल्या जखमेवर देखील उपचार करण्यात आले आहेत. या घटनेत सुदैवाने आजींचे प्राण वाचले असून त्या सुखरुप आहेत. डॉक्टरांमुळे आणि आजींच्या नशिबामुळे त्या वाचल्या असल्याचे म्हटले जातेय.