पुणे, 20 सप्टेंबर : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव, पोंदेवाडी, अवसरी परिसरात शनिवारी सायंकाळी झालेल्या पावसाने शेतीच मोठं नुकसान झालं आहे. खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने एक प्रकारे ढगफुटी सारखी अवस्था पाहायला मिळाली. यात शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर काही ठिकाणी शेतीच वाहून गेली आहे. लाखणगाव पोंदेवाडी या दोन्ही गावामधील तलाव, राजोबा पाझर तलाव या मधून खूप वेगाने पाण्याचा विसर्ग झाल्याने ओठया लगतच्या शेतात पाणी घुसले. या भागात पंचनामे करावे आणि नुकसान मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. असा पाऊस आणि अशी ढगफुटी कधीही पहिली नाही अस या परिसरातील शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद बटाटा पिकाचे पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी दौरा करून परतले आणि मागे पुन्हा एकदा या परिसरात झालेल्या अतिवृष्टीने शेतकरी धास्तावला. शेतात जे काही पीक राहिलं होतं ते पावसाच्या माऱ्याने जमिनीच्या वर आलं. आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठारावरील सुमारे सात हजार हेक्टर क्षेत्रावरील पावसाच्या पाण्यावर घेतले जाणार एकमेव मुख्य नगदी पीक असलेले बटाटा पीक काढणीच्या अंतिम टप्प्यात आहे. पण परतीच्या मुसळधार पावसामुळे हे पिक मोठ्या संकटात सापडले असून रोज संध्याकाळी पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे हे पीकसुद्धा भुईसपाट झाले आहे. कोरोनाच्या संकटामुळे बटाटा काढणीसाठी मजुर मिळेणासे झाले. त्यात प्रचंड मिनतवारी करुन आदिवासी मजुर स्वखर्चाने आणुन जेवण - राहण्याची व्यवस्था करुन तब्बल 700-800 रुपये जोडी देऊन बटाटा काढणी करावी लागत आहे. मात्र आता उरल्या सुरल्या आशेवर सुद्धा पावसाने आज पुन्हा पाणी फिरवले आहे. त्यामुळे बळीराजा हताश झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.