विकी कौशलच्या भावाचा धक्कादायक खुलासा, विकीच्याच गर्लफ्रेंडवर होता डोळा

विकी कौशलच्या भावाचा धक्कादायक खुलासा, विकीच्याच गर्लफ्रेंडवर होता डोळा

इंटवव्ह्यू पाहिल्यानंतर विकीला सर्व माहित होणार. यावर सनीने हसत उत्तर दिले की, त्याला हे नाही माहित पडणार की मला त्याची कोणती गर्लफ्रेंड आवडत होती.

  • Share this:

नवी दिल्ली 19 जानेवारी : चित्रपट अभिनेता विकी कौशलचा भाऊ सनी कौशलने एका इंटरव्यूमध्ये मोठा खुलासा केला आहे. सनी कौशल याने इंटवव्यूमध्ये म्हणाला की, त्याला विकी कौशलची गर्लफ्रेंड आवडत होती. मात्र त्याला हे माहित नव्हते की, त्याचा भाऊ त्याच मुलीला डेट करत आहे. याबाबत सनी कौशलने त्याच्या भावाला कधीच सांगितले नाही.

याबाबत बोलताना सनी कौशल म्हणाला की, 'मला जी मुलगी आवडते ती माझ्या भावाची गर्लफ्रेंड आहे हे मला माहित नव्हते. या गोष्टीबद्द्ल मला नंतर समजले की ते दोघे डेट करत आहेत. हे माझ्या भावनाबद्दल मी अजूनही विकीला सांगितले नाही.'

त्यानंतर सनीला विचारण्यात आलं की, इंटवव्ह्यू पाहिल्यानंतर विकीला सर्व माहित होणार. यावर सनीने हसत उत्तर दिले की, त्याला हे नाही माहित पडणार की मला त्याची कोणती गर्लफ्रेंड आवडत होती. सनीला अभिमान आहे की, त्याला विकीमुळे इंडस्ट्रीमध्ये ओळखतात. मात्र, त्याला सिनेमा इंडस्ट्रीमध्ये स्वतःची जागा तयार करायची आहे.

इतर बातम्या - Facebook ने राष्ट्रपतींच्या नावावर गंभीर चूक, मागावी लागली जाहीर माफी

सनीला समाजामध्ये स्वतःची वेगळी ओळख तयार करायची आहे. मला विकीचा भाऊ म्हणून समाजात ओळखले जाते ही गोष्ट माझ्यासाठी अभिमानाची आहे. कारण याच्यावरुन माहित पडतं की, विकीने समाजात स्वतःची ओळख किती चांगल्याप्रकारे तयार केली आहे. मात्र, सनी कौशलला या गोष्टीचे टेंशन आहे की, समाजात माझी ओळख कधी तयार होणार. ही अशी गोष्ट आहे जी सर्वांनकडे असली पाहिजे. मग तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असो.

सनी कौशलची वेबसीरीज 'द फॉरगॉटन आर्मीः आजादी' लवकरच रिलीज होणार आहे. कबीर खान याने ही वेबसीरीज दिग्दर्शित केली असून यात सुभाष चंद्र बोस यांच्या सैनिकांची गोष्ट सांगितली गेली आहे. ज्यांनी भारताला स्वतंत्र्य मिळवून देण्यासाठी मह्त्त्वाची कामगिरी केली होती.

इतर बातम्या - शबाना आझमींच्या अपघातानंतर लोक का करतायत या सैनिकाला सलाम?

First published: January 19, 2020, 3:19 PM IST

ताज्या बातम्या