मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

English Learning Tips: आता इंग्रजीला घाबरू नका; घरबसल्या अशा पद्धतीनं Free मध्ये शिका इंग्लिश

English Learning Tips: आता इंग्रजीला घाबरू नका; घरबसल्या अशा पद्धतीनं Free मध्ये शिका इंग्लिश

अशाप्रकारे घरबसल्या Free मध्ये शिका English

अशाप्रकारे घरबसल्या Free मध्ये शिका English

आज आम्ही तुम्हाला घरबसल्या Free मध्ये कशाप्रकारे इंग्लिश बोलणं (How to Learn English For free at home) आणि वाचणं शिकता येईल हे सांगणार आहोत.

  • Published by:  Atharva Mahankal

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर: आजकालच्या जगात इंग्लिशला (Importance of English) इतर कोणत्याही जागतिक भाषेपेक्षा अधिक महत्त्वं आहे. त्यात आपल्या भारतात ज्याला इंग्लिश (How to Learn English) बोलता येतं, लिहिता येतं आणि वाचता येतं अशा लोकांना सर्व क्षेत्रांमध्ये प्राधान्य दिलं जातं. अगदी अंगणवाडीपासून तर जीवनाच्या शेवट्पर्यंत इंग्लिशशिवाय जगात कोणाचंही काम होत नाही. मात्र आपल्यापैकी अनेकांना इंग्लिशच भयंकर भीती (How to remove fear of English) वाटते. कोणीही इंग्लिश बोलणारी व्यक्ती समोर आली तर आपण स्वतःला कमी समजतो. इंग्लिश येत नसेल तर आत्मविश्वासही कमी होतो. मात्र आता चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला घरबसल्या Free मध्ये कशाप्रकारे इंग्लिश बोलणं (How to Learn English For free at home) आणि वाचणं शिकता येईल हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

स्वतःपासून करा सुरुवात

इंग्लिश घरबसल्या विनाशुल्क शिकण्यासाठी सुरुवातीला आपल्यामध्ये बदल घडवणं आवश्यक आहे. इंग्लिश शिकण्यासाठी तुमची आवड बदलवणं महत्त्वाचं आहे. यासाठी सुरुवातीला इंग्लिश पुस्तकं वाचायला सुरुवात (Tips to Read English Books) करा. सुरुवातीला काही समजलं नाहीतर डिक्शनरीची मदत घ्या. हळूहळू इंग्लिश वाचनाची सवय लावा यामुळे तुमचा शब्दसाठा वाढेल.

मोठ्यानं वाचनाची लावा सवय

पुस्तकं वाचताना तुमच्या मनात पुस्तकं वाचू नका. घरात मोठ्यानं पुस्तकं वाचा. यामुळे तुमच्यासह कुटुंबातील सदस्यांच्या कानावरही इंग्लिश शब्द पडतील तसंच तुमचे उच्चारही स्पष्ट होतील. इंग्लिश बोलण्यासाठी ही टीप (Tips for talking in English fluently) कामी येऊ शकते.

इंग्रजी सिनेमा बघा किंवा गाणी ऐका

हे एक चांगली प्रॅक्टिस ठरू शकते. इंग्लिश बोलण्यासाठी तुम्हाला समोरच्यांकडून ऐकून समजून घेणंही महत्त्वाचं आहे. त्यामुळे जर तुम्ही इंग्लिश सिनेमा (Best English movies for learning English) बघितला किंवा गाणी ऐकलीत तर तुम्हाला इंग्लिश समजून घेण्यात मदत होईल. तसंच सरावामुळे इंग्लिश लवकर बोलता येईल.

उमेदवारांनो, नवी नोकरी जॉईन करताना 'या' 4 गोष्टींचा नक्की करा विचार

ऑनलाईन गेम्स खेळा

आजकाल ऑनलाईन अनेक इंग्रजीच्या परीक्षा घेणारे गेम्स (Online English learning Games Apps) उपलब्ध आहेत. या गेम्स मध्ये तुम्हाला काही ग्रामर आणि वाक्यांशी निगडित प्रश्न विचारले असतात. या प्रश्नांची योग्य उत्तरं देऊन तुम्ही तुमचं इंग्रजी व्याकरण अधिक चांगलं करू शकता.

मित्रांशी किंवा कुटुंबियांशी बोला

इंग्रजी शिकण्यासाठी दैनंदिन जीवनात इंग्रजीचा समावेश करणं आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या कुटुंबियांशी, मित्रांशी इंग्लिशमध्येच संवाद साधा. मेसेजवर बोलतानाही इंग्लिशमध्येच बोला. यामुळे तुम्हाला योग्य व्याकरण वापरून इंग्लिश बोलण्याची सवय लागेल. अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या इंग्रजी एक्सपर्ट व्हाल यात शंका नाही.

First published:

Tags: Career