मुंबई, 30 ऑगस्ट : ई-पास बंद करावा यावर राज्य सरकार अनुकूल नाही. असंही ज्यांना गरज आहे अशांनाच ई पास दिला जातो असं मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारने टाळेबंद बाबत नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यात ई-पास निर्बंध उठवावे अशा सूचना केल्या आहेत. मात्र, यासाठी राज्य सरकार अनुकूल नसल्याचे सूर उमटत आहेत.
वास्तविक, लोकांमध्ये ई-पास यावरून नाराजी आहे. त्यामुळे केंद्राच्या नियमानंतर राज्य सराकर याबाबत नेमकी काय भूमिका घेते हे पाहवे लागणार आहे. राज्य सरकारची उद्यापर्यंत नवीन नियमावली येईल असं सांगितले जाते. केंद्र सरकारने इयत्तेतील वर्ग सुरू कराव्यात अशा सूचना दिल्या आहेत. त्यावर आम्ही मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा करून निर्णय घेऊ अशी माहिती वडे्ड्टीवार यांनी दिली आहे.
चिंता वाढली! राज्यात मुंबई, पुण्यानंतर तयार होतोय कोरोनाचा नवा हॉटस्पॉट
राज्य सरकारच्यावतीने जिम शाळा सुरू करण्याबाबत सावध पवित्रा घेतला जात आहे. ई-पास वरून लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ई-पास रद्द करावा अशी जोरदार मागणी आहे. पण ग्रामीण भागांमध्ये कोविड संकट वाढत असल्याने राज्य सरकार याबाबत फारसं अनुकूल दिसत नसल्याची चर्चा आहे.
BMC ने सील केली गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची इमारत, नेमकं काय झालं?
दरम्यान, उद्या मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यासह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची सकाळी बैठक होईल आणि त्यानंतर संध्याकाळपर्यंत नवीन नियमावली जाहीर केली जाईल अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे यावेळी अनलॉकच्या नियमांमध्येही काय बदल होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
केंद्र सरकारने जारी केलेल्या नव्या नियमांनुसार (Unlock 4.0) प्रवासासाठी लागणारी परवानगी E pass आता हद्दपार होण्याची चिन्हं आहेत. कारण नवीन गाईडलाईन्समध्ये राज्यांतर्गत आणि आंतरराज्य वाहतुकीसाठी पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही, असं स्पष्ट म्हटलं आहे.