मुंबई, 22 सप्टेंबर : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर आज राज्य सरकार कॅबिनेट बैठकीत चर्चा करून महत्वाच्या घोषणा करणार असल्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे. शिक्षण आणि नोकरीत मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली. यानंतर सरकारने विविध संघटनाकडून उपाय सुचवण्याचं आवाहन केलं होतं. यात अनेक सूचना आल्या आहेत. त्यावर कायदेशीर विचार करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यात काही महत्वपूर्ण निर्णय निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे आज मंत्रिमंडळ बैठक आणि त्यानंतर होणारी मंत्री गट बैठक यात हे निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. तर यामध्ये नोकर भरती आणि विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश यावर घोषणा होण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे. ‘माल है क्या?’ दीपिकाचं ड्रग्ज चॅट समोर आल्यानंतर कंगना पुन्हा आक्रमक दरम्यान, सुप्रीम कोर्टाने दिलेली स्थगिती उठवण्यासंदर्भात राज्य सरकारने आज सुप्रीम कोर्टाच्या मोठ्या खंडपीठासमोर विनंती अर्ज केला होता अशी माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सोमवारी दिली होती. या प्रश्नावर राज्याने एक पाऊल पुढे टाकले आहे असंही अशोक चव्हाण यांनी सांगितलं होतं. मुख्यमंत्री या प्रश्नावर लवकरच सविस्तर भूमिका मांडतील असंही त्यांनी म्हटलं होतं. ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन, शूटिंगदरम्यान झाला कोरोना मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सोमवारी राज्यात ठिकठिकाणी आंदोलने झालीत. सरकारने तातडीने कारवाई करत आरक्षणासाठी पावलं टाकावी अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे. या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या काही दिवसांमध्ये मंत्रिमंडळातील सहकारी आणि कायदेतज्ज्ञांशी चर्चेच्या अनेक फेऱ्या केल्या होत्या. सरकारकडे उपलब्ध असलेले पर्याय आणि त्यावर कसं पुढे जायचं याबाबत सरकारने आराखडा तयार केला आहे. या प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक बोलावू राजकीय एकमत घडवून आणण्याचा प्रयत्नही केला गेला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.