Home /News /news /

कोरोनाशी लढणाऱ्या SRPF च्या जवानांचे आधी केले जंगी स्वागत, त्यानंतर...

कोरोनाशी लढणाऱ्या SRPF च्या जवानांचे आधी केले जंगी स्वागत, त्यानंतर...

या आधीही दौंड येथील राज्य राखीव दलातील एका तुकडीतील 9 जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते.

    सुमित सोनवणे, प्रतिनिधी दौंड, 06 मे : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला आहे. मुंबईत सर्वाधिक रुग्णांची संख्या आहे. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी पोलीस दलासह राज्य राखीव दलाच्या जवान जीवाची बाजी लावून कर्तृव्य बजावत आहे. परंतु, पोलीस आणि जवानांनाही कोरोनाची लागण झाली. त्यामुळेच अशाही परिस्थितीत लढा देणाऱ्या जवानांचं दौंडकरांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलं आहे. दौंड मधील राज्य राखीव दल गट क्रमांक 5 ची एक तुकडी मुंबई येथे बंदोबस्त पूर्ण करून दौंड इथं दाखल झाली. दौंड तालुक्यातील बेटवाडी ग्रामस्थांनी या जवानांच्या गाडीवर पुष्प वर्षाव करून जवानांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले. या अनोख्या स्वागताने जवान भारावून गेले. हेही वाचा -पश्चिम बंगालच्या मजुरांची फरफट; 2400 जणांना स्वीकारण्यास ममता सरकारचा नकार बेटवाडी येथे गावच्या स्वागत कमानीजवळ, दौंड-पाटस रोडवर रांगोळी काढून, फटाके वाजवून या जवानांच्या वाहनांवर फुलांची उधळण करून आनंदाने स्वागत करण्यात आले. त्यानंतर सर्व वाहने पुढे दौंडकडे मार्गस्थ झाली. या अचानक आणि अनोख्या प्रकारच्या स्वागताने जवान भारावून गेले व त्यांच्या चेहर्‍यावर आनंदाचे क्षण दिसून आले. हे सर्व जवान मुंबईवरून आपला 3 महिन्याचा बंदोबस्त पूर्ण करून आल्यामुळे या srpf च्या 100 जवानांना दौंड मधील नानाविज पोलीस प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी क्वारंटाइन करण्यात आले असून दौंड उपजिल्हा रुग्णालयाकडून त्यांची स्वब टेस्ट घेऊन पुण्याला पाठवण्यात येणार आहे. हेही वाचा - सरकारचा मोठा निर्णय! रिक्षाचालक, धोबी, न्हावी, शेतकरी, कामगारांना बेरोजगार भत्ता या आधीही दौंड येथील राज्य राखीव दलातील एका तुकडीतील 9 जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. कर्तव्य पार पाडून येत असताना जवानांचे अशा प्रकारचे स्वागत झाल्यास त्यांचे निश्चित मनोबल वाढेल.  संपादन - सचिन साळवे
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या