नवी दिल्ली, 6 मे : कोरोना व्हायरसचा (Coronavirus) कहर दिवसेंदिवस वाढत आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत 1694 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात 49391 कोरोनाबाधित (Covid -19) आहेत. कोरोनाचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात दिसून येत आहे. महाराष्ट्रात देशातील अनेक राज्यातील प्रवासी अडकून पडले आहेत. त्यातच पश्चिम बंगालमधील सरकारने आपल्या राज्यातील महाराष्ट्रात अडकलेल्या प्रवाशांना स्वीकारण्यास नकार दिला आहे. महाराष्ट्र सरकारने पश्चिम बंगालमधील 2400 प्रवाशांना पाठवण्यास हिरवा कंदील दाखवला होता. मात्र ममता सरकारने त्यांना राज्यात घेण्यास नकार दिला आहे.
दुसरीकडे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Aadityanath Yogi) महाराष्ट्रात अडकलेल्या प्रवाशांना राज्यात आणण्याबाबत गोंधळ असल्याचे दिसून येत होते. सांगितले जात आहे की, सध्या योगी सरकाराने मुंबई, पुणे आणि ठाण्यात अडकलेल्या प्रवाशांना राज्यात आणण्यास तयार दर्शवली आहे. याशिवाय बिहारने प्रवाशांना राज्यात घेण्यास पाठ फिरवली आहे. ते म्हणाले, सध्या महाराष्ट्रात ज्या प्रमाणे कोरोनाच्या केसेस वाढत आहेत, त्यावरुन विचारपूर्वक निर्णय घेतला जाईल.
महाराष्ट्र सरकारतर्फे पश्चिम बंगालच्या (West Bangal) नागरिकांना घरी पाठविण्याची तयारी पूर्ण झाली होती. महाराष्ट्राच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, महाराष्ट्र अडकलेल्या पश्चिम बंगालमधील सर्व प्रवाशांनी ओळख पटविण्यात आली आहे. आम्ही फक्त पश्चिम बंगालच्या सरकारकडून होकाराची प्रतीक्षा करीत आहोत.
महाराष्ट्र सरकारने देशातील विविध राज्यांमधील मजुरांना येथे राहण्यासाठी सोय केली आहे. मात्र अनेक मजुर आपल्या घरी जाण्याचा प्रयत्न करीत आहे. लॉकडाऊन लागू झाल्यानंतर अनेकजण पायीच आपल्या गावी जाण्यास निघाले होते.
संबंधित -आता या तिसऱ्या लॉकडाऊननंतर काय? सोनिया गांधींचा मोदींना थेट सवाल
हिज्बुलचा कमांडर रियाझ नायकूचा खात्मा; गणिताचा शिक्षक कसा झाला क्रूरकर्मा?
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.