अजित पवार म्हणतात, या कारणांमुळे मी आता सांभाळूनच बोलतो

अजित पवार म्हणतात, या कारणांमुळे मी आता सांभाळूनच बोलतो

मागील काळात चुकीच्या बोलण्यानं मला आत्मक्लेश करावा लागला होता. आता मी सांभाळूनच बोलतो.

  • Share this:

प्रशांत बाग, नाशिक 31 जानेवारी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचा झपाटा अजुनही कायम आहे. नाशिक जिल्ह्यात विविध कामांसाठी त्यांनी आज सकाळी 7 पासूनच कार्यक्रमांना हजेरी लावायला सुरुवात केली. नंतर दुपारी त्यांनी नाशिकमध्ये विभागीय आढावा बैठक घेतली आणि अधिकाऱ्यांची चर्चा केली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सगळ्यांनाच सांभाळून बोलण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, आम्ही जबाबदार पदावर काम करतो. आम्हाला बोलण्याचं तारतम्य बाळगणं महत्वाचं आहे. त्यामुळे वाद कमी होतील.

मागील काळात चुकीच्या बोलण्यानं मला आत्मक्लेश करावा लागला होता. अजुन कोणताही जिल्हा निर्मितीचा निर्णय नाही. मागणी अनेक आहे मात्र विचार नाही. गेल्या वर्षी 9 हजार कोटींचं निधी वाटप झालं. गेल्या वर्षी नागपूरला 237 कोटी जास्त दिले,चंद्रपूरला 107 कोटी जास्त दिले.

तुम्ही अ‍ॅक्सिडंटल मुख्यमंत्री आहेत का? उद्धव ठाकरेंनी दिलं हे बेधडक उत्तर

जिल्हा नियोजन बैठकीत मंजूर करणं शक्य नसलेला निधी राज्य अर्थसंकल्पात तरतूद करणार. पोलीस, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, नर्स, महसूल विभागात कर्मचारी कमतरता आहे.

8 हजार नवीन पोलीस भरती करणार, अनेक विभागात नवीन कर्मचारी भरती करणार. अनुसूचित जाती उपयोजना करिता प्रत्येक जिल्ह्याला अतिरिक्त निधी मंजूर. मागच्या सरकार काळात आदिवासी विकास करीता काहीच प्रयत्न झाला नाही.

राज्यातील 36 जिल्ह्यात निधी देण्यासाठी सूत्र ठरवलं. लोकसंख्या, क्षत्रेफळ या आधारावर सूत्र ठरलं. उत्तर महाराष्ट्रात शाळा, आरोग्य, ग्रामीण रस्ते याकरीता निधी मंजूर. मुख्यमंत्री प्रत्येक विभागात सर्व कामांचा आढावा घेताय.

भाजपच्या जवळच्या लोकांनीच घडवला भीमा कोरेगावचा हिंसाचार - अनिल देशमुख

मी आर्थिक नियोजन करण्यासाठी बैठका घेतोय. गेल्या वेळी 9 हजार कोटींचं नियोजन होतं. यंदा कर्जमाफी मुळ सरकारी तिजोरीवर आर्थिक ताण आहे. 2 लाखावरील कर्जदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी समिती गठीत. आमदारांना त्यांचा 20 टक्के निधी शाळा वर्ग बांधण्यासाठी देणं बंधनकारक करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: ajit pawar
First Published: Jan 31, 2020 04:29 PM IST

ताज्या बातम्या