व्यायाम करतानाही सलमानला आजूबाजूला लागतात सुपरस्टार, हा घ्या पुरावा

सलमान खान जे काही करतो त्याची बातमी होते असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्याच्या प्रत्येक गोष्टींवर प्रसारमाध्यमांची नजर असते.

News18 Lokmat | Updated On: May 5, 2019 07:00 PM IST

व्यायाम करतानाही सलमानला आजूबाजूला लागतात सुपरस्टार, हा घ्या पुरावा

मुंबई, 5 मे- सलमान खान जे काही करतो त्याची बातमी होते असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्याच्या प्रत्येक गोष्टींवर प्रसारमाध्यमांची नजर असते. सध्या तो दबंग ३ सिनेमाच्या दुसऱ्या सत्राच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या सिनेमात दाक्षिणात्य सिनेमांचा सुपरस्टार किच्चा सुदीप खलनायकाची भूमिका साकारत आहे. नुकताच त्याने दबंग ३ सिनेमाच्या टीमसोबत सहभागी झाला. आज सुदीपचा सेटवरचा पहिला दिवस असून पुढील वाटचालीसाठी तो उत्सुक असल्याचंही म्हणाला.

याशिवाय सुदीप आणि सलमान एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवत आहेत. सुदीपने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून दोघांचा एक फोटो शेअर केला. या फोटोला कॅप्शन देताना त्याने लिहिले की, ‘उकाडा असह्य आहे. पण तरीही सेटवरच्या एनर्जीवर याचा परिणाम होणार नाही. फार आनंददायी दिवस होता. उत्तम युनिट, चांगले लोक आणि सेटवर तयार करण्यात आलेलं जिम हा तर एक बोनसच. दबंग ३ सिनेमाच्या पहिल्या दिवसाचं चित्रीकरण पूर्ण झालं. मला घरासारखा अनुभव देण्यासाठी सलमान खानचे आभार.’

सलमानच्याच पावलांवर पाऊल ठेवतं कतरिनानेही घेतली महागडी कारसलमान नाही तर 'हा' अभिनेता आहे कतरीनाचा गुरू, खुद्द भाईजाननंच केला गौप्यस्फोट

सुदीपने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो आणि सलमान जिममध्ये उभे असलेले दिसत आहेत. सध्या दोन सुपरस्टारचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दोघांना जेव्हा वेळ मिळतो ते एकत्र वर्कआउट करतात. दबंग ३ सिनेमातून सुदीप पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सिनेमाचं दिग्दर्शन प्रभू देवा करत असून पुढच्या वर्षी २० डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

एकमेकांवर वस्तू फेकून मारायचे अर्जुन आणि मेहर, त्या भांडणानंतर घेतला घटस्फोटाचा निर्णय

सिनेमाचं चित्रीकरण मध्यप्रदेशच्या महेश्वर येथे सुरू झालं होतं. इथेच सिनेमाच्या टायटल ट्रॅकचं चित्रीकरण करण्यात आलं. चित्रीकरणावेळचे अनेक फोटो आणि व्हिडीओही व्हायरल झाले होते. या सिनेमाचं चित्रीकरण संपलं की सलमान लगेच ‘इंशाअल्लाह’ या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत आलिया भट्ट काम करणार आहे.

VIDEO: 'त्या' बोल्ड दृश्याबद्दल प्रिया बापटनं अखेर मौन सोडलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 5, 2019 07:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...