मुंबई, 5 मे : सलमान खानचा मागील वर्षी रिलीज झालेला 'रेस 3' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही मात्र त्याचा आगामी सिनेमा 'भारत'कडून सलमान आणि त्याच्या चाहत्यांनाही खूप अपेक्षा आहेत. या सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला. सलमानच्या 'सुलतान' आणि 'टायगर जिंदा है' या सिनेमांचं दिग्दर्शन करणारे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक अलीअब्बास जफर आता 'भारत'ही दिग्दर्शन करत आहेत. हा सिनेमा कोरियन सिनेमा 'ओड टू माय फादर'चा हिंदी रिमेक आहे.
'भारत'मध्ये सलमान व्यतिरिक्त दिशा पटानी आणि कतरीना कैफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पण त्यांच्याशिवाय या सिनेमातील आणखी एका अभिनेत्याची सोशल मीडियावर खूप चर्चा सुरू आहे. हा अभिनेता म्हणजे कॉमेडियन सुनील ग्रोवर. सोशल मीडियावर स्वतःचा चांगला फॅन फॉलोविंग असलेल्या सुनिलच्या या सिनेमातील भूमिकेमुळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी होण्याची शक्यता जास्त वाढते. नुकत्याच एका लाइव्ह प्रमोशनमध्ये सलमान आणि कतरीना सुनीलबाबत अनेक गोष्टी सांगितल्या.
VIDEO: 'त्या' बोल्ड दृश्याबद्दल प्रिया बापटनं अखेर मौन सोडलं
सलमान सांगतो, 'सुनील एक चांगला अभिनेता आहे. तो फक्त मिमिक्री करत नाही तर एखादी भूमिका साकारताना तो पूर्णपणे त्या भूमिकेत शिरतो. मग ती गुत्थीची भूमिका असो किंवा मग अमिताभ-धर्मेंद्र यांचा अभिनय करणं असो. तो कधीच चीप कॉमेडी करत नाही तो प्रत्येक कलाकाराला त्याचा योग्य मान देतो आमि त्याच्या बूमिकाही चांगल्या प्रकारे साकारतो. तो खूप टॅलेंटेड आहे. खरं पाहता मला या सिनेमात अनेक प्रतिभावान कलाकारांसोबत काम करायची संधी मिळाली.'
यावेळी कतरीनानंही सुनीलची स्तुती केली. कतरीना म्हणाली, 'शूटिंगमधील काही दिवस असे होते. जेव्हा मी सकाळी 8 वाजता सेटवर यायचे त्यावेळी मला सलमानची बराच वेळ वाट पाहावी लागत असे. तेव्हा मी आणि सुनील बराच वेळ गप्पा मारत असू. त्यावेळी मला समजलं की, सुनील केवळ टॅलेंटेडच नाही तर तर त्याला जगातल्या बऱ्याच गोष्टींची माहिती आहे. त्याला अनेक पुस्तकं आणि भारतीय परंपरांबद्दल खूप काही माहीत आहे. त्याच्याशी तुम्ही कोणत्याही विषयावर बोलू शकता. त्याच्यासोबत वेळ घालवणं माझ्यासाठी खूप मजेदार होतं.'
कतरीनाच्या या वाक्यावर सलमान गंमतीनं म्हणाला, 'जर तुम्हाला सुनील ग्रोवर कुठेही भेटले तर तुम्ही त्यांच्याशी कोणत्याही विषयावर बोलू शकता कारण कतरीना कैफ असं सांगितलं आहे. ते आमचे गुरु आहेत. अंतर्यामी आहेत आणि त्यांना सर्व गोष्टींची माहिती असते.' त्यावर कतरीनाला आपलं हसू आवरता आलं नाही. सलमानचा 'भारत' ईदच्या मुहूर्तावर 5 जूनला रिलीज होत आहे.
...म्हणून दर अर्ध्या तासानं पत्नीला फोन करतो 'बधाई हो'मधील 'हा' अभिनेता