Home /News /news /

महाविकास आघाडीत काही आमदार नाराज, पण.., संजय राऊतांनी दिली कबुली

महाविकास आघाडीत काही आमदार नाराज, पण.., संजय राऊतांनी दिली कबुली

kunal kamra invites sanjay raut on his podcast

kunal kamra invites sanjay raut on his podcast

'संपूर्ण बहुमताचे सरकार असले तरी त्यात नाराज असतातच आणि इथे तर तीन पक्षांचे आघाडी सरकार आहे'

    मुंबई, 29  नोव्हेंबर : 'महाविकास आघाडी सरकार टिकणार नाही असे पहिल्याच दिवशी ज्यांना वाटले ते वर्षपूर्तीनंतरही सरकार पाडायचे प्रयोग करीत आहेत. सरकार तीन पक्षांचे आहे. त्यात नाराजी आहे, पण तरीही ते टिकेल. शिवसेनेचा मुख्यमंत्री त्या परिस्थितीत होणे ही तोकड्या तलवारीची लढाई होती' असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीमध्ये नाराजी असल्याचे मान्य केले आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरात पहिल्यांदाच संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापनेचा घटनाक्रम मांडला आहे. तसंच महाविकास आघाडीमध्ये काही आमदार नाराज असल्याचेही त्यांनी कबूल केले आहे. 'संपूर्ण बहुमताचे सरकार असले तरी त्यात नाराज असतातच आणि इथे तर तीन पक्षांचे आघाडी सरकार आहे. मंत्र्यांची व काही आमदारांची नाराजी व्यक्तिगत मानपानाची आहे. ती मुख्यमंत्र्यांनाच दूर करावी लागेल' असं राऊत म्हणाले. सोने दरात 8000 तर, चांदीत 19000 हून अधिक घसरण; येत्या काळात काय असतील भाव? तसंच, 'हे सरकार किती टिकेल यावर आजही प्रश्न निर्माण केले जात आहेत. त्यांनी अमित शहा यांचे एक प्रगल्भ विधान समजून घेतले पाहिजे. ‘आघाडी सरकारमध्ये तीन प्रमुख पक्ष आहेत. त्यातील एखादा पक्ष बाहेर पडल्याशिवाय सरकार पडणार नाही.’ हेच सत्य आहे. यापैकी एकही पक्ष आघाडीतून बाहेर पडण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे मध्य प्रदेश पिंवा राजस्थान पॅटर्न वापरायचा हे ठरवले, पण राजस्थान पॅटर्न फसला व मध्य प्रदेशात ‘सिंधिया’ पॅटर्न यशस्वी झाला. अजित पवार यांच्यावर लक्ष ठेवा असे अलीकडे सातत्याने सांगितले जाते, पण आज सगळय़ात जास्त भरवशाचे तेच आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांना कुरतडून काही हाती लागेल काय यावर ऑपरेशन सुरू आहे' असं अजितदादांचं कौतुक करत भाजपला टोला लगावला आहे. शरद पवार संतापून बाहेर पडले 'मल्लिकार्जुन खरगे, पृथ्वीराज चव्हाण यांचे लक्ष सत्तेच्या वाटणीत राष्ट्रवादीला काय मिळत आहे यावरच होते. नेहरू सेंटरमधल्या 22 नोव्हेंबरच्या वाटाघाटीत मल्लिकार्जुन खरगे यांच्या एका वक्तव्याने ठिणगी पडली. विधानसभेचे अध्यक्षपद कोणाकडे? अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाता कामा नये अशी भूमिका खरगे वगैरे मंडळींनी घेतली. तेथे खरगे व शरद पवार यांच्यात शाब्दिक चकमक झाली. पवारांना इतके संतापलेले मी प्रथमच पाहिले. ते त्राग्याने टेबलावरचे कागद गोळा करून निघाले. त्यांच्या पाठोपाठ मी व प्रफुल पटेल धावत गेलो. त्याच बैठकीत सुरुवातीला आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार उद्धव ठाकरे असतील हे पवार यांनीच सुचवले, पण खरगे, पवार चकमकीने बैठकीचा नूर पालटला. यानंतर  अजित पवार हे बराच काळ त्यांच्या मोबाईल फोनवर खाली मान घालून ‘चॅटिंग’ करत होते. त्यानंतर तेही बैठकीतून बाहेर पडले. अजित पवारांचा फोन त्यानंतर ‘स्विच ऑफ’ झाला व दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांचे दर्शन थेट राजभवनावरील शपथविधी सोहळ्यात झाले. फडणवीस-अजित पवारांचा शपथविधी सुरू असतानाच एक महत्त्वाचा फोन मला आला, ‘‘तुमचे सरकार बनत नाही. फडणवीस-अजित पवार शपथ घेत आहेत. अजित पवारांनी एनसीपी फोडली.' अमित शहांच्या घरी शरद पवारांची बैठक झालीच नाही! 'पहाटेच्या शपथविधीपूर्वी शरद पवार, अमित शहा यांच्यात दिल्लीत बैठक झाली अशा प्रकारच्या गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस अशी बैठक झाली व त्यात पहाटेच्या शपथविधीचे ‘नाटय़’ तयार झाले हे सर्वस्वी चूक आहे. अमित शहा यांच्या घरी एक बैठक झाली. त्यात एक बडे उद्योगपती व राष्ट्रवादीचे नेते असावेत. पवार या काळात दिल्लीत असताना त्यांच्यात व माझ्यात उत्तम संवाद होता व जवळ जवळ रोजच आम्ही भेटत होतो. नक्की कोठे काय सुरू आहे याचे ‘अपडेटस्’ एकमेकांना देत होतो. भारतीय जनता पक्षाशी कोणतेही डील करण्याच्या मनःस्थितीत मला  पवार दिसले नाहीत. ‘‘भाजपकडून सरकार बनविण्यासंदर्भात विविध स्तरांवरून ऑफर्स येत आहेत’’ हे त्यांचे सांगणे होते. ‘‘लवकरच पंतप्रधान मोदी यांना भेटून मी भाजपबरोबर सरकार स्थापन करणे शक्य नाही असे सांगणार आहे’’ हे त्यांनी मला सांगितले. याच काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पवार मोदींना भेटायला गेले व महाराष्ट्रातील सरकार स्थापनेबाबत सांगायचे ते सांगून आले. त्यामुळे पवारांनी भाजपला शब्द दिला होता व त्यानुसार पहाटेच्या हालचाली झाल्या हे खोटेच आहे' असं म्हणत राऊत यांनी फडणवीस यांचा दावा खोडून काढला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या