सोने दरात आतापर्यंत 8000 तर, चांदीत 19000 हून अधिक घसरण; जाणून घ्या येत्या काळात काय असतील भाव

सोने दरात आतापर्यंत 8000 तर, चांदीत 19000 हून अधिक घसरण; जाणून घ्या येत्या काळात काय असतील भाव

आता कोरोना वॅक्सिन लवकरच येणार असल्याच्या सकारात्मक बातम्यांमुळे, रुपयाची मजबूती वाढली असून शेअर बाजारातही तेजी आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यातील गुंतवणूक काढून ती इतर ठिकाणी लावण्यास सुरूवात केली आहे. यामुळे गगनाला भिडलेले सोन्या-चांदीचे दर आता घसरले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर : कोरोना संकट काळात गुंतवणूकदारांचा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे कल होता. यामुळे सोन्याच्या दरात जबरदस्त वाढ झाली होती. आता कोरोना वॅक्सिन लवकरच येणार असल्याच्या सकारात्मक बातम्यांमुळे, रुपयाची मजबूती वाढली असून शेअर बाजारातही तेजी आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यातील गुंतवणूक काढून ती इतर ठिकाणी लावण्यास सुरूवात केली आहे. यामुळे गगनाला भिडलेले सोन्या-चांदीचे दर आता घसरले आहेत. सध्या या दरात वाढ होण्याची कोणतीही चिन्ह नसल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.

फेब्रुवारी 2021 पर्यंत सोन्याचे दर 42000 रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत पोहचण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. तर चांदीच्या दरातही घसरणीचा ट्रेंड सुरुच राहील, असं जाणकारांचं म्हणणं आहे.

(वाचा - 'हा' रक्तगट असलेल्यांना कोरोनाचा सर्वात कमी धोका;व्हिटॅमिन डी बाबतही मोठा खुलासा)

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोन्याचा दर उच्चांकी पातळीवर होता. 7 ऑगस्ट रोजी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आता शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 48,142 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. सोन्याचे दर ऑगस्ट महिन्यातील उच्चांकी स्तरानंतर आतापर्यंत, 8,058 रुपये प्रति 10 ग्रॅमने घसरले आहेत.

तर, चांदीचा भाव 10 ऑगस्ट रोजी प्रति किलोग्रॅम 78,256 रुपये इतका होता. जो शुक्रवारी 28 नोव्हेंबर रोजी 59,250 रुपये प्रति किलोग्रॅमवर आला आहे. त्यामुळे ऑगस्टपासून आतापर्यंत चांदीच्या किंमतीत 19,000 रुपये प्रति किलोग्रॅमहून अधिक घसरण झाली आहे.

(वाचा - अलर्ट! आधारसंबंधी 'हे' काम कोणी पैसे घेऊन करत असेल, तर अशी करा तक्रार)

कोरोना वॅक्सिनच्या सकारात्मक चर्चांमुळे सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण होत आहे. केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून कोरोना वॅक्सिनचे जवळपास 40 कोटी डोस खरेदी करण्याची चर्चा केली आहे. त्यामुळे बाजारात स्थिरता येईल आणि गुंतवणूकदार, सोन्यात गुंतवणूक न करता दुसऱ्या पर्यांयाकडे वळतील. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मजबूतीमुळेही सोन्याच्या किंमतीत घसरण होत आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वलर्स असोसिएशनने सांगितलं की, जर सोन्याच्या दरातील घसरण अशीच सुरू राहिली तर, मागणीत मोठी वाढ होईल. ही मागणी लग्नसमारंभासाठी अधिक प्रमामात असेल.

Published by: Karishma Bhurke
First published: November 29, 2020, 10:53 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading